मंडणगड एसटी आगारातून बोरिवली, नालासोपाऱ्यासाठी बससेवा

मंडणगड : मंडणगड एसटी आगारामार्फत करोनाच्या आरोग्यविषयक सर्व नियमावलींचे पालन करून सोमवार, २४ मेपासून बोरिवली (मुंबई) आणि नालासोपारा मार्गावर बससेवा सुरू होत आहे.

मंडणगड-बोरिवली बस सकाळी ८.३० वाजता सुटेल आणि परतीच्या प्रवासासाठी ती बोरिवलीहून सकाळी सव्वासहा वाजता सुटेल. मंडणगड तिडे नालासोपारा मार्गावरील बस रोज दुपारी दीड वाजता सुटेल. नालासोपाऱ्याहून ती रोज सकाळी साडेसहा वाजता सुटणार आहे. या दोन्ही गाड्या मुंबईकडे जाताना पनवेलपासून पुढे सर्व एसटी थांब्यावर थांबणार आहेत. परतीच्या प्रवासात महाडपासून पुढे लांब पल्ल्याच्या सर्व थांब्यावर थांबणार आहेत. अत्यावश्यक सेवेमधील आणि गरजू प्रवाशांनी या फेऱ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटीमार्फत करण्यात आले आहे.

प्रवासाच्या ववेळी मास्क, सॅनिटायझर वापरणे आणि शासनाच्या आरोग्यविषयक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रवाशांचा पुरेसा प्रतिसाद मिळाला, तर या फेऱ्या कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात येणार आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply