सिंधुदुर्गात एकाच दिवशी विक्रमी ११२५ रुग्ण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, २४ जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ११२५ आणि एकूण ३२ हजार ५९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. दरम्यान, वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयातील वाढीव ५० खाटांच्या नव्या विभागाचे उद्घाटन शुक्रवारी होणार आहे.

सध्या जिल्ह्यात ५ हजार ७२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुसऱ्यांदा तपासणी केलेल्या ५ जणांसह ४०४ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ३५, दोडामार्ग – २३, कणकवली – ८५, कुडाळ – ८९, मालवण – ६५, सावंतवाडी – ४५, वैभववाडी – १३, वेंगुर्ले – ४३, जिल्ह्याबाहेरील १. एकूण करोनाबाधितांची संख्या ३९ हजार ३२० झाली आहे.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ६८२, दोडामार्ग १९६, कणकवली ११०७, कुडाळ ११६९, मालवण ९३७, सावंतवाडी ६६०, वैभववाडी ३०८, वेंगुर्ले ६४७, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २३. सक्रिय रुग्णांपैकी ३०४ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ९९० झाली आहे. आज नोंद झालेल्या ८ मृतांसह इतर मृतांचा तपशील असा – कणकवली ९, कुडाळ १, मालवण ५, वैभववाडी १.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड १३०, दोडामार्ग – २९, कणकवली – २०३, कुडाळ – १४९, मालवण – १९०, सावंतवाडी – १४१, वैभववाडी – ६७, वेंगुर्ले – ७५, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ६.

वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयाचे शुक्रवारी लोकार्पण

वेंगुर्ले येथे उभारण्यात आलेल्या ५० खाटांच्या नव्या रुग्णालयीन इमारतीचे शुक्रवार, २५ जून रोजी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण होणार आहे.

वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात नवीन इमारत उभारून तेथे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यात येत आहे. त्याच्या उद्घाटनाच्या ऑनलाइन समारंभाला आरोग्य मंत्री राजेश टोपे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर उपस्थित असणार आहेत. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply