सिंधुदुर्गात नव्या बाधितांपेक्षा करोनामुक्तांच्या संख्येत वाढ

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नव्या करोनाबाधित रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे.

आज, २९ जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ५८० आणि एकूण ३४ हजार ६८१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आज नवे ३१० करोनाबाधित आढळले.

सध्या जिल्ह्यात ५ हजार ५७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुसऱ्यांदा तपासणी केलेल्या ९ जणांसह ३१० व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी ही माहिती दिली.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – २२, दोडामार्ग – १६, कणकवली – ४७, कुडाळ – ९५, मालवण – ५०, सावंतवाडी – १६, वैभववाडी – २५, वेंगुर्ले – ३०. एकूण करोनाबाधितांची संख्या ४१ हजार ३०१ झाली आहे.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ७९२, दोडामार्ग २०७, कणकवली १०४३, कुडाळ ११२७, मालवण ९१७, सावंतवाडी ६२२, वैभववाडी २५८, वेंगुर्ले ५८४, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २२. सक्रिय रुग्णांपैकी २५९ रुग्ण ऑक्सिजनवर तर ५० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात ५ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १०४६ झाली आहे. आज नोंद झालेल्या आणि आधी मरण पावलेल्यांच्या आज झालेल्या मृतांचा तपशील असा – देवगड १, कणकवली २, कुडाळ ३, मालवण ३, वैभववाडी १, वेंगुर्ले २.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड १३६, दोडामार्ग – ३२, कणकवली – २१२, कुडाळ – १६१, मालवण – २०७, सावंतवाडी – १४४, वैभववाडी – ६९, वेंगुर्ले – ७९, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ६.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply