सिंधुदुर्गात करोनामुक्तांपेक्षा नवे रुग्ण चौपटीहून अधिक

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, २८ जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत १२० आणि एकूण ३४ हजार १०१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आज नवे ५४९ करोनाबाधित आढळले. करोनामुक्तांपेक्षा नवबाधितांची संख्या चौपटीहून अधिक आहे.

सध्या जिल्ह्यात ५ हजार ८६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुसऱ्यांदा तपासणी केलेल्या २० जणांसह ५४९ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ९०, दोडामार्ग – २२, कणकवली – ९२, कुडाळ – १२०, मालवण – ८८, सावंतवाडी – ३४, वैभववाडी – २५, वेंगुर्ले – ५७, जिल्ह्याबाहेरील १. एकूण करोनाबाधितांची संख्या ४१ हजार झाली आहे.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ७७५, दोडामार्ग २०९, कणकवली १०८०, कुडाळ १३५९, मालवण ८८४, सावंतवाडी ६६७, वैभववाडी २८४, वेंगुर्ले ५८३, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २२. सक्रिय रुग्णांपैकी २८२ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात ४ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १०३४ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तपशील असा – कणकवली २, कुडाळ २.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड १३५, दोडामार्ग – ३२, कणकवली – २१०, कुडाळ – १५८, मालवण – २०४, सावंतवाडी – १४४, वैभववाडी – ६८, वेंगुर्ले – ७७, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ६.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply