रत्नागिरी जिल्ह्यात नव्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त अधिक

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२८ जून) नव्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. नवबाधितांची संख्याही चारशेच्या खाली आली असून मृतांची संख्याही घटली आहे. जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे.

आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – २३६, अँटिजेन चाचणी – ९५ (एकूण ३३१). आधी नोंद न झालेल्या ४९ रुग्णांची नोंद आज झाली. त्यांच्यासह जिल्ह्यातील आजचे एकूण रुग्ण ३८० आहेत. त्यांच्यासह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ६१ हजार २२ झाली आहे. जिल्ह्याचा आजचा रुग्णवाढीचा दर ७.४३ झाला आहे. एकूण रुग्णवाढीचा दर १४.६३ टक्के आहे.


आज पाच हजार ७१० सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज पाच हजार ३९८ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील तीन लाख ६३ हजार ३९३ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज ७४१ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ५३ हजार ५७४ झाली आहे. करोनामुक्तांची आजची टक्केवारी ८७.८८ टक्के आहे.

जिल्ह्यात कालचा १ आणि आजचे ४ अशा पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ७३८ झाली आहे. मृत्युदर २.८५ टक्के आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी ५६४, खेड १६६, गुहागर १३८, दापोली १४५, चिपळूण ३४३, संगमेश्वर १५१, लांजा ९२, राजापूर १०१, मंडणगड २४. इतर जिल्ह्यातील १३. (एकूण १७३८).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply