सिंधुदुर्गात नवबाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या तिपटीहून अधिक

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा आज तिपटीहून अधिक शंभर रुग्ण करोनामुक्त झाले.

आज, ८ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ९२४ आणि एकूण ३८ हजार ९६३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आज दुबार तपासणी केलेल्या ९ जणांसह नवे २७५ करोनाबाधित रुग्ण आढळले. एकूण बाधितांची संख्या आता ४३ हजार ९९७ झाली आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

सध्या जिल्ह्यात ३ हजार ९३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ४७, दोडामार्ग – ८, कणकवली – ४२, कुडाळ – ६७, मालवण – ५४, सावंतवाडी – १९, वैभववाडी – ६, वेंगुर्ले – २२, जिल्ह्याबाहेरील १.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ५८०, दोडामार्ग १२४, कणकवली ६१०, कुडाळ ९०२, मालवण ६९३, सावंतवाडी ५००, वैभववाडी १६३, वेंगुर्ले ३४३, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २०. सक्रिय रुग्णांपैकी २१४ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४३ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात देवगड तालुक्यातील एका रुग्णाचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १०९७ झाली आहे. आधी मरण पावलेल्या मालवण तालुक्यातील रुग्णाची नोंद आज झाली.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १४४, दोडामार्ग – ३४, कणकवली – २१९, कुडाळ – १६७, मालवण – २२७, सावंतवाडी – १५०, वैभववाडी – ६७, वेंगुर्ले – ८३, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ६.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply