रत्नागिरी जिल्ह्यात नवबाधितांपेक्षा निम्म्याहून कमी करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (८ जुलै) ४२५ नवे करोनाबाधित आढळले, तर त्यापेक्षा निम्म्याहून कमी म्हणजे २०४ रुग्ण करोनामुक्त झाले.

आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – २१५, अँटिजेन चाचणी – १८० (एकूण ३९९). आधी नोंद न झालेल्या ३० रुग्णांची नोंद आज झाली. त्यांच्यासह जिल्ह्यातील आजचे एकूण रुग्ण ४२५ आहेत. त्यांच्यासह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ६५ हजार ४४९ झाली आहे. जिल्ह्याचा आजचा रुग्णवाढीचा दर ९.४१ झाला आहे. एकूण रुग्णवाढीचा दर १३.६४ टक्के आहे.

आज पाच हजार ३० सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात दोन हजार ३५९ गृह विलगीकरणात, दोन हजार ६७० संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आणखी ७५१ जणांची कोविन पोर्टलवर नोंद होणे बाकी आहे.
आज चार हजार ६४९ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील चार लाख २१ हजार ४७३ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज २०४ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ५७ हजार ८७१ झाली आहे. करोनामुक्तांची आजची टक्केवारी ८८.४२ टक्के आहे.

जिल्ह्यात आज ४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ८३७ झाली आहे. मृत्युदर २.८१ टक्के आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी ५९८, खेड १७१, गुहागर १३८, दापोली १६०, चिपळूण ३५८, संगमेश्वर १७०, लांजा ९४, राजापूर १०७, मंडणगड २७. इतर जिल्ह्यातील १३. (एकूण १८३७).
………….

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply