सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे ४४ हजार ६३३ रुग्ण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (३१ जुलै) करोनाचे १७७ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले. आतापर्यंत जिल्ह्यात ४४ हजार ६३३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात सध्या दोन हजार ५१५ सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ३११, दोडामार्ग ५८, कणकवली ४५४, कुडाळ ७०५, मालवण ३६५, सावंतवाडी २८२, वैभववाडी २७४, वेंगुर्ले १५४, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १४. सक्रिय रुग्णांपैकी १४८ रुग्ण ऑक्सिजनवर तर ३५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत दुबार तपासणी केलेल्या एका रुग्णांसह १५४ नवे करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या ४८ हजार ३९९ झाली आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – १९, दोडामार्ग – १, कणकवली – ३५, कुडाळ – ३१, मालवण – १५, सावंतवाडी – २२, वैभववाडी – १६, वेंगुर्ले – १४.

आज जिल्ह्यात कालच्या १ आणि आजच्या ४ अशा ५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार २४९ झाली आहे. आजच्या मृतांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड १, कणकवली १, मालवण २, वेंगुर्ले १.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १६०, दोडामार्ग – ३५, कणकवली – २५८, कुडाळ – १९१, मालवण – २५७, सावंतवाडी – १७०, वैभववाडी – ७२, वेंगुर्ले – ९७, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply