सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्ह्यात आज (८ ऑगस्ट) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार एकाही करोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झाली नाही.
आज ९६ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले. त्यांच्यासह आतापर्यंत ४५ हजार ७५१ रुग्ण करोनामुक्त झाले. सध्या जिल्ह्यात २ हजार २९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज जिल्ह्याबाहेरील तिघांच्या लॅब तपासणीसह आणखी ११७ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ४९ हजार १९९ झाली आहे.
जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड १६, दोडामार्ग १, कणकवली ३४, कुडाळ २३, मालवण ५, सावंतवाडी २०, वैभववाडी ७, वेंगुर्ले १०. सक्रिय रुग्णांपैकी ८८ रुग्ण ऑक्सिजनवर तर ३० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ३५७, दोडामार्ग ५३, कणकवली ३९०, कुडाळ ५८९, मालवण ३१०, सावंतवाडी २९६, वैभववाडी १०५, वेंगुर्ले १८०, जिल्ह्याबाहेरील १६.
आज जिल्ह्यात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. मात्र यापूर्वीच्या कणकवली आणि कुडाळ तालुक्यातील प्रत्येकी एक अशा दोन मृत्यूंची नोंद आज झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार २६७ झाली आहे.
जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १६२, दोडामार्ग – ३५, कणकवली – २६५, कुडाळ – १९५, मालवण – २६०, सावंतवाडी – १७२, वैभववाडी – ७२, वेंगुर्ले – ९७, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.
………………………

