रत्नागिरी जिल्ह्यात करोनामृतांची टक्केवारी स्थिर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (८ ऑगस्ट) करोनामुळे सात जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे २.९३ हा मृत्युदर आजही स्थिर राहिला आहे.

आज १०६ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले, तर त्याहून अधिक म्हणजे १५३ रुग्ण करोनामुक्त झाले.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ६८ हजार ८७६ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९४.३१ झाली आहे.

आज आढळलेल्या नव्या १०६ करोनाबाधित रुग्णांचा तपशील असा –
आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या तीन हजार १५ नमुन्यांपैकी दोन हजार ९८४ अहवाल निगेटिव्ह, तर ३१ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या दोन हजार १४५ पैकी दोन हजार ७० अहवाल निगेटिव्ह, तर ७५ पॉझिटिव्ह आले. दोन्ही मिळून १०६ पॉझिटिव्ह रुग्ण आज आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७३ हजार ३३ झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील पाच लाख ५८ हजार ३५४ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज एक हजार ९९० सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले एक हजार ६०७, तर लक्षणे असलेले ३८३ रुग्ण आहेत. ९९३ रुग्ण गृह विलगीकरणात, ९९७ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात असून २५ रुग्णांची पोर्टलवर नोंद होणे बाकी आहे. सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ६१४, डीसीएचसीमधील १६०, तर डीसीएचमध्ये २२३ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १२० जण ऑक्सिजनवर, ७५ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

यापूर्वीच्या ३ आणि आजच्या ४ अशा एकूण ७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील २.३२ हा मृत्युदर वाढून तो २.९३ टक्के झाला आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या दोन हजार १४२ झाली आहे. त्यापैकी ५० वर्षे आणि त्यावरील वयाच्या मृतांची संख्या एक हजार ७९४ (८३.७५ टक्के), तर मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी सहव्याधी (कोमॉर्बिड) असलेल्या रुग्णांची संख्या ७६० (३५.४८ टक्के) आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३१, दापोली १८४, खेड १८५, गुहागर १५४, चिपळूण ४०९, संगमेश्वर १८७, रत्नागिरी ७३६, लांजा ११५, राजापूर १४१. (एकूण २१४२).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply