सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी करोनाबाधिताचा मृत्यू नाही

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्ह्यात आज (९ ऑगस्ट) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार सलग दुसऱ्या दिवशी करोनामुळे मरण पावलेल्या एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

आज ४८ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले. त्यांच्यासह आतापर्यंत ४५ हजार ७९९ रुग्ण करोनामुक्त झाले. सध्या जिल्ह्यात २ हजार ३३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज दुबार तपासणी केलेल्या तिघांच्या तपासणीसह आणखी ८३ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ४९ हजार ३९९ झाली आहे.

जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ३, दोडामार्ग ३, कणकवली ९, कुडाळ २२, मालवण २६, सावंतवाडी १६, वैभववाडी ३, वेंगुर्ले १. सक्रिय रुग्णांपैकी ८५ रुग्ण ऑक्सिजनवर तर २५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ३५८, दोडामार्ग ५६, कणकवली ३९७, कुडाळ ६११, मालवण ३३३, सावंतवाडी २८८, वैभववाडी ९५, वेंगुर्ले १७७, जिल्ह्याबाहेरील १६.

आज जिल्ह्यात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार २६७ एवढीच आहे.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १६२, दोडामार्ग – ३५, कणकवली – २६५, कुडाळ – १९५, मालवण – २६०, सावंतवाडी – १७२, वैभववाडी – ७२, वेंगुर्ले – ९७, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply