सिंधुदुर्ग जिल्ह्यात चोवीस तासांत एकाच करोनाबाधिताचा मृत्यू

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१७ ऑगस्ट) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत एकाच करोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झाली. नव्या बाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या आजही अधिक आहे.

आज ६९ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले. त्यांच्यासह आतापर्यंत ४६ हजार ८२१ रुग्ण करोनामुक्त झाले. सध्या जिल्ह्यात १ हजार ९६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज एका रुग्णाच्या दुबार तपासणीसह ४४ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५० हजार ९१ झाली आहे.

जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड १०, दोडामार्ग १, कणकवली १, कुडाळ १३, मालवण ५, सावंतवाडी ५, वैभववाडी ४, वेंगुर्ले ३, जिल्ह्याबाहेरील १. सक्रिय रुग्णांपैकी ७६ रुग्ण ऑक्सिजनवर तर २२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड २८९, दोडामार्ग ४४, कणकवली ३२२, कुडाळ ५६१, मालवण ३११, सावंतवाडी २३५, वैभववाडी ७१, वेंगुर्ले १२१, जिल्ह्याबाहेरील १५.

आज जिल्ह्यात साळगाव (ता. कुडाळ) येथील एका करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार २९९ झाली आहे.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १६४, दोडामार्ग – ३५, कणकवली – २७२, कुडाळ – २०२, मालवण – २६१, सावंतवाडी – १७९, वैभववाडी – ७७, वेंगुर्ले – १००, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply