राष्ट्रसेविका समितीच्या कथाकथन स्पर्धेत अर्णव पटवर्धन सर्वोत्कृष्ट

रत्नागिरी : राष्ट्रसेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठानने भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या क्रांतिकारकांच्या कथा स्पर्धेत अर्णव मकरंद पटवर्धन याला सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचे बक्षीस मिळाले. भार्गवी विवेक केळकर, अर्थ आनंद पारखी आणि मनवा हृषिकेश जोशी यांनीही यश मिळवले. (सादरीकरणाचे व्हिडिओ शेवटी दिले आहेत.)

राष्ट्रसेविका समितीतर्फे रत्नागिरीत दर शनिवारी सायंकाळी ४ ते ५ या वेळेत ऑनलाइन संस्कार वर्ग चालवला जातो. त्यामध्ये रत्नागिरीसह विविध ठिकाणचे शालेय विद्यार्थी सहभागी झाले होतात. संस्कार वर्गाचे नियोजन सुनेत्रा जोशी आणि विशाखा सोमण करत आहेत. या वर्गात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांची कथाकथन स्पर्धा घेण्यात आली. याचा निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण सौ. मीरा भिडे, सौ. अर्चना फाटक यांनी केले. विजेत्यांना प्रमाणपत्र आणि पारितोषिक पोस्टाने पाठविण्यात येणार आहेत

स्पर्धेचा निकाल असा – सर्वोत्कृष्ट- अर्णव मकरंद पटवर्धन (परशुरामपंत अभ्यंकर प्राथ. विद्यामंदिर, रत्नागिरी), प्रथम- भार्गवी विवेक केळकर (पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी), द्वितीय- अर्थ आनंद पारखी (सें. मॉंटफोर्ट स्कूल, भोपाळ), तृतीय- मनवा हृषिकेश जोशी (एम. एन. जोशी इंग्लिश मीडियम स्कूल, रत्नागिरी), उत्तेजनार्थ- वैष्णवी भागवत (युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण), आरिषा यदमळ (रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेड), निधेय ढोले (सेंट थॉमस स्कूल, रत्नागिरी), वेद गोगटे (श्री. मो. गोगटे विद्यालय, जामसंडे, सिंधुदुर्ग). कौतुकास्पद- प्रिशा यदमळ (रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेड), श्रीराम देव (किडझी प्री स्कूल), राघव पटवर्धन (दामले विद्यालय, रत्नागिरी).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply