सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१८ ऑगस्ट) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत करोनाचे नवे ५७ रुग्ण आढळले, तर २५ रुग्ण बरे होऊन घरी गेले.
आज बरे झाल्याने घरी गेलेल्या २५ जणांसह आतापर्यंत ४६ हजार ८४६ रुग्ण करोनामुक्त झाले. सध्या जिल्ह्यात १ हजार ९९९ सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्यात आज एका रुग्णाच्या दुबार तपासणीसह ५७ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५० हजार १४८ झाली आहे.
जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ७, दोडामार्ग ३, कणकवली ८, कुडाळ ९, मालवण ४, सावंतवाडी २०, वैभववाडी ५, वेंगुर्ले १. सक्रिय रुग्णांपैकी ७४ रुग्ण ऑक्सिजनवर तर १८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड २९५, दोडामार्ग ४३, कणकवली ३२१, कुडाळ ५६५, मालवण ३१४, सावंतवाडी २४९, वैभववाडी ७६, वेंगुर्ले १२१, जिल्ह्याबाहेरील १५.
आज जिल्ह्यात मणचे (ता. देवगड) आणि डिगस (ता. कुडाळ) येथील प्रत्येकी एका करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार ३०१ झाली आहे.
जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १६५, दोडामार्ग – ३५, कणकवली – २७२, कुडाळ – २०३, मालवण – २६१, सावंतवाडी – १७९, वैभववाडी – ७७, वेंगुर्ले – १००, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.
Follow Kokan Media on Social Media

