रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुक्तांची टक्केवारी ९४.६८

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१८ ऑगस्ट) ९७ रुग्ण करोनामुक्त झाले. करोनामुक्तांची एकूण संख्या आता ७० हजार ५८७ झाली असून ही टक्केवारी ९४.६८ आहे.

आज नवे १३४ करोनाबाधित आढळले असून त्यांचा तपशील असा –
आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या २६७७ नमुन्यांपैकी २६२२ अहवाल निगेटिव्ह, तर ५५ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या १८६३ पैकी १७८४ अहवाल निगेटिव्ह, तर ७९ पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७४ हजार ५५७ झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील सहा लाख १५ हजार ५९४ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज १६९४ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले १३६४, तर लक्षणे असलेले ३३० रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ९४९ आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ४११, डीसीएचसीमधील १३३, तर डीसीएचमध्ये १९७ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १६३ जण ऑक्सिजनवर, ६८ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

यापूर्वीच्या १४ आणि आजच्या ३ अशा एकूण १७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ३.१५ टक्के होता. या आठवड्यात तो २.९९ टक्के झाला आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर १ टक्के आहे.
जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २२३२ झाली आहे. त्यापैकी ५० वर्षे आणि त्यावरील वयाच्या मृतांची संख्या १८६९ (८३.७४ टक्के), तर मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी सहव्याधी (कोमॉर्बिड) असलेल्या रुग्णांची संख्या ८०० (३५.८४ टक्के) आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३४, दापोली १९५, खेड १९२, गुहागर १५८, चिपळूण ४३३, संगमेश्वर १९४, रत्नागिरी ७६०, लांजा ११८, राजापूर १४८. (एकूण २२३२).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply