सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे ४४ बाधित, ६१ रुग्ण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२६ ऑगस्ट) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार करोनाचे ४६ नवबाधित आढळले, तर ६१ जण करोनामुक्त झाले.

दोघांच्या जिल्ह्याबाहेरील लॅबमधील तपासणीसह आज नवे ४६ करोनाबाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५० हजार ५९९ झाली आहे. जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ६, दोडामार्ग १, कणकवली ८, कुडाळ १०, मालवण ७, सावंतवाडी ११, वैभववाडी ०, वेंगुर्ले ३.

सक्रिय रुग्णांपैकी ७० रुग्ण ऑक्सिजनवर तर १४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड २०२, दोडामार्ग ४९, कणकवली ३१३, कुडाळ ३८९, मालवण २४०, सावंतवाडी १९१, वैभववाडी ६१, वेंगुर्ले १०२, जिल्ह्याबाहेरील १५.

आज जिल्ह्यात ३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. तसेच याआधी मरण पावलेल्या २ रुग्णांचीही नोंद आज झाली. त्यांचा तपशील असा – दोडामार्ग १, कणकवली २, मालवण १, सावंतवाडी १.

जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार ३४३ झाली आहे.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १६७, दोडामार्ग – ३७, कणकवली – २७८, कुडाळ – २१५, मालवण – २६९, सावंतवाडी – १८४, वैभववाडी – ८०, वेंगुर्ले – १०४, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply