सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे नवे २० रुग्ण, एकही रुग्ण करोनामुक्त नाही

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार आज (६ सप्टेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंत करोनाचे २० नवबाधित आढळले. त्यामध्ये दुबार तपासणी केलेल्या तिघांचा समावेश आहे. आज एकही रुग्ण करोनामुक्त झाला नाही.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५१ हजार ७२ झाली आहे. जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड २, कणकवली ३, कुडाळ ४, मालवण १, सावंतवाडी ७.

जिल्ह्यात सध्या १४५७ सक्रिय रुग्ण असून सक्रिय रुग्णांपैकी ४६ रुग्ण ऑक्सिजनवर तर १७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड १८३, दोडामार्ग ५७, कणकवली २२८, कुडाळ ३६७, मालवण २३४, सावंतवाडी २२१, वैभववाडी ४८, वेंगुर्ले ९८, जिल्ह्याबाहेरील २१.

आज जिल्ह्यात नाटळ (कणकवली) येथील एका करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार ३७३ झाली आहे.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १६९, दोडामार्ग – ३९, कणकवली – २८३, कुडाळ – २२६, मालवण – २७५, सावंतवाडी – १८८, वैभववाडी – ८१, वेंगुर्ले – १०४, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply