रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे १२५ नवबाधित, ११८ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (६ सप्टेंबर) जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार ११८ रुग्ण करोनामुक्त झाले, तर १२५ नवे करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील करोनामुक्तांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७२ हजार ८५३ झाली असून, बरे होण्याची टक्केवारी ९५.२९ एवढीच राहिली आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या १२५ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ३०५१ नमुन्यांपैकी २९५५ अहवाल निगेटिव्ह, तर ९६ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या ११८० पैकी ११५१ अहवाल निगेटिव्ह, तर २९ पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७६ हजार ४५७ झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील सहा लाख ८२ हजार ६६ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे. आज ९७३ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ६५६, तर लक्षणे असलेले ३१७ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ४९१ आहे, तर ४८२ जण संस्थात्मक विलगीकरणात असून २७१ जणांची नोंद अजून पोर्टलवर झालेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले १६५, डीसीएचसीमधील १५०, तर डीसीएचमध्ये १६७ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ९६ जण ऑक्सिजनवर, ५३ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
आज दोघा आणि आधीच्या तीन अशा एकूण ५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर २.९५ टक्के होता. या आठवड्यात तो ३.०९ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.२१ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २३६० झाली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३५, दापोली २१२, खेड २१३, गुहागर १६६, चिपळूण ४६२, संगमेश्वर २०४, रत्नागिरी ७८८, लांजा १२४, राजापूर १५६. (एकूण २३६०).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply