मुंबईतील एनआरपी ग्रुपतर्फे लांजा महिलाश्रमात वस्तूंचे वाटप

लांजा : मुंबईतील एन. आर. पी. ग्रुपतर्फे लांजा येथील महिलाश्रमाती सर्व महिला, मुले यांना ब्लॅंकेट, चादरी आणि वह्यांचे वाटप करण्यात आले.

वाघ्रट गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि मुंबईस्थित उद्योजक ऋषीनाथ तथा दादा पत्याने यांच्या वाढदिवसानिमित्त एनआरपी ग्रुपने लांजा तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. त्याचाच एक भाग म्हणून लांजा येथील महिलाश्रमातील महिला, मुले या सर्वांना ब्लँकेट, चादरी आणि व वह्यांचे वाटप करण्यात आले. दाजी पत्त्याने डेअरी फार्मच्या वतीने मोफत दूध वितरण करण्यात आले.

याबरोबरच जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत दहावी-बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. करोनाबाबत असणारे शासनाचे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून हे कार्यक्रम केल्याचे एन. आर.पी. ग्रुपचे अध्यक्ष नितीश पत्याने यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी पुनस सरपंच इलियास बंदरी, उद्योजक प्रमिल पत्याने, अमित कदम, आंबा व्यापारी सुनील पत्त्याने, विनोद सावंत, चांदोर पोलीस पाटील प्रवीण मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply