रत्नागिरीत १४५ जण करोनामुक्त; ३५ नवे रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २० सप्टेंबर) जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार १४५ रुग्ण करोनामुक्त झाले, तर ३५ नवे करोनाबाधित आढळले. सलग तिसऱ्या दिवशी करोनामुक्तांची संख्या चांगली आहे.

जिल्ह्यातील करोनामुक्तांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७४ हजार २२४ झाली असून, बरे होण्याची टक्केवारी वाढून ती ९५.९७ झाली आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या ३५ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या १७९४ पैकी १७७५ अहवाल निगेटिव्ह, तर १९ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या १५३५ नमुन्यांपैकी १५१९ अहवाल निगेटिव्ह, तर १६ पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७७ हजार ४१९ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख २९ हजार ३७३ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज ६५० सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ३३१, तर लक्षणे असलेले ३१९ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या २९५ आहे, तर ३५५ जण संस्थात्मक विलगीकरणात असून ७१ जणांची नोंद अजून पोर्टलवर झालेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ३६, डीसीएचसीमधील १३३, तर डीसीएचमध्ये १६६ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ७२ जण ऑक्सिजनवर, ३५ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

यापूर्वीच्या तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ४.०५ टक्के होता. या आठवड्यात तो ३.१० टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २३९४ झाली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३७, दापोली २१४, खेड २१९, गुहागर १६६, चिपळूण ४७१, संगमेश्वर २०८, रत्नागिरी ७९६, लांजा १२४, राजापूर १५९. (एकूण २३९४).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply