सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९० जण करोनामुक्त; १२ नवे रुग्ण

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (३ नोव्हेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत १२ नवे रुग्ण आढळले, तर ९० जण करोनामुक्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय करोनाबाधितांची संख्या १६८ झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आज जिल्ह्याबाहेरील लॅबमधील एका तपासणीसह नवे १२ करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड १, दोडामार्ग ०, कणकवली २, कुडाळ ५, मालवण २, सावंतवाडी ०, वैभववाडी ०, वेंगुर्ले २.

जिल्ह्यात सध्या १६८ सक्रिय रुग्ण असून सक्रिय रुग्णांपैकी १७ रुग्ण ऑक्सिजनवर, तर ७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड १३, दोडामार्ग १८, कणकवली २१, कुडाळ ४१, मालवण २०, सावंतवाडी ३३, वैभववाडी ६, वेंगुर्ले १५, जिल्ह्याबाहेरील १.

आज माणगाव (ता. कुडाळ) येथील ६८ वर्षांच्या एका पुरुष रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. त्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४५२ आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १७९, दोडामार्ग – ४३, कणकवली – २९७, कुडाळ – २४२, मालवण – २८८, सावंतवाडी – २०२, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – ११०, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply