रत्नागिरी : येथून प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक कोकण मीडियाच्या यावर्षीच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन रत्नागिरीचे माजी आमदार तथा दि यश फाउंडेशनचे संस्थापक बाळ माने यांच्या हस्ते आज (दि. ५ नोव्हेंबर) रत्नागिरीत झाले.

अंकाचे प्रकाशन रत्नागिरीत हॉटेल मथुरा येथे झाले. यावेळी ज्येष्ठ प्राध्यापिका सुजन शेंड्ये, सौ. माधवी माने, ज्येष्ठ विधिज्ञ विलास पाटणे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे आणि कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर उपस्थित होते.
कोकण मीडियाचा हा सहावा दिवाळी अंक आहे. इम्युनिटी या मध्यवर्ती विषयावर हा अंक प्रसिद्ध करण्यात आला आहे. याच विषयावरच्या कथा स्पर्धेचा निकाल, विजेत्या कथा, अन्य कथा, कविता, व्यंगचित्रे तसेच इन्फिनिटी या विषयासंदर्भातील लेख अंकात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या अंकाच्या निमित्ताने एक व्हिडीओ मालिका तयार करण्यात आली आहे. रोगप्रतिकारशक्ती हा गुंतागुंतीचा विषय आहे. जन्मतः अनेकांची प्रतिकारशक्ती चांगली असते; पण ती वयामुळे, चुकीच्या आहाराने, वाईट सवयींनी कमी होते. त्यात बदल घडवून रोगप्रतिकारशक्ती वाढविता येते; मात्र तो फरक तातडीने दिसत नाही. हे सारे कसे करायचे याविषयी योग, आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञांच्या मुलाखती कोकण मीडियाच्या यूट्यूब चॅनेलवर प्रसारित करण्यात आल्या आहेत. डॉ. कल्पना मेहता, योगतज्ज्ञ शशिकांत लिमये, आयुर्वेदतज्ज्ञ मंदार भिडे, राष्ट्रीय गुरू मुरलीधर प्रभुदेसाई, दंतवैद्य चंद्रशेखर जोशी, बालरोगतज्ज्ञ शरद प्रभुदेसाई, आहारतज्ज्ञ सौ. भाग्यश्री करंदीकर, डॉ. श्रीधर ठाकूर, डॉ. प्रणव प्रभू यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. त्याविषयीची थोडक्यात माहिती अंकात स्वतंत्रपणे देण्यात आली आहे.
अंकात
वैचारिक लेख आणि कवितांबरोबरच व्यंगचित्रेही प्रसिद्ध करण्यात आली आहेत. योगेश चव्हाण आणि दत्तात्रय म्हेतर या व्यंगचित्रकारांच्या कुंचल्यातून ती साकारलेली आहेत.
या अंकातील अन्य साहित्याविषयी सविस्तर वाचा पुढील लिंकवर…
अंकाची किंमत १५० रुपये असून
हा अंक मुंबई, पुणे, कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी उपलब्ध आहे. अंक घरपोच मागवण्यासाठी https://wa.me/919850880119 या व्हॉट्सअॅप लिंकवर क्लिक करून आपली मागणी नोंदवावी.
अधिक माहितीसाठी ९४२२३८२६२१ किंवा ९४२३२९२१६२
या क्रमांकांवर संपर्क साधावा.
हा अंक ई-बुक स्वरूपातही विविध प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे. त्याच्या लिंक्स सोबत देत आहोत. अंकाची झलकही तेथे पाहता येईल.
बुकगंगा डॉट कॉम : https://www.bookganga.com/R/8FEJK
मॅग्झटर : https://bit.ly/3EsKdBy
गुगल प्ले बुक्स : https://bit.ly/2ZE325W