रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १८ नोव्हेंबर) करोनाचे ४ नवे रुग्ण आढळले, तर ६ रुग्ण करोनामुक्त झाले. ही आकडेवारी कालच्याएवढीच असली, तरी जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या आज ५३वरून ५० आली आहे.
जिल्हा चिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार, आज दुपारी तीन वाजेपर्यंतच्या २४ तासांत ४ नवे रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ७९ हजार ३० झाली आहे. आज ६ रुग्ण बरे झाल्याने आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार ४९६ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९६.७९ आहे.
जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ४३६ पैकी ४३३ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. ३ अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या ६२६ नमुन्यांपैकी ६२५ अहवाल निगेटिव्ह, तर १ पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख २४ हजार ३०१ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
आज जिल्ह्यात ५० सक्रिय रुग्ण आहेत. त्यात लक्षणे नसलेले ३४, तर लक्षणे असलेले १६ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ३४ आहे, तर संस्थात्मक विलगीकरणात १६ जण आहेत. एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ६, तर डीसीएचमध्ये १० रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण नाही. बाधितांपैकी ६ जण ऑक्सिजनवर, ४ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर २.७८ टक्के होता. या आठवड्यात तो ३.१४ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर २ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४८४ आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२१, खेड २२८, गुहागर १७३, चिपळूण ४७८, संगमेश्वर २२३, रत्नागिरी ८२७, लांजा १३०, राजापूर १६५. (एकूण २४८४).
लसीकरणाची स्थिती
जिल्ह्यात १७ नोव्हेंबरपर्यंतच्या स्थितीनुसार ९ लाख ३३ हजार ६४९ जणांनी करोनाप्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला आहे. ४ लाख १२ हजार ७६१ जणांनी लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. एकूण १३ लाख ४६ हजार ४१० जणांचे लसीकरण झाले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड