pexels-photo-5863391.jpeg

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचा एकमेव नवा रुग्ण, करोनाप्रतिबंधक २० हजार डोस शिल्लक

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशी करोनाचा एकच नवा रुग्ण आढळला असून नऊ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात करोनाप्रतिबंधक लशींचे २० हजार ६०० डोस नागरिकांसाठी उपलब्ध आहेत.

आज (१६ डिसेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्यात आज नऊ रुग्ण करोनामुक्त झाले. आज कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही.

जिल्ह्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या १९ असून आतापर्यंत ५१ हजार ७३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत ५३ हजार २१९ रुग्ण बाधित आढळले, तर आतापर्यंत १ हजार ४६३ रुग्णांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात आज आढळलेला नवा रुग्ण कणकवली तालुक्यातील आहे.

जिल्ह्यात सध्या सक्रिय असलेल्या १९ रुग्णांपैकी एकही रुग्ण ऑक्सिजनवर नाही. दोन रुग्ण चिंताजनक असल्याने व्हेंटिलेटरवर आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ३, दोडामार्ग ०, कणकवली ६, कुडाळ १, मालवण २, सावंतवाडी ५, वैभववाडी ०, वेंगुर्ले २, जिल्ह्याबाहेरील ०.

आज एकाही रुग्णाचा मृत्यू नोंदविला गेला नसल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४६३ एवढीच आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८०, दोडामार्ग – ४४, कणकवली – २९९, कुडाळ – २४३, मालवण – २८८, सावंतवाडी – २०७, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १११, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

लसीकरणाची स्थिती

जिल्ह्यात वाढत्या करोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५ लाख ६० हजार १३६ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. त्यामध्ये एकूण ९ हजार ८५५ हेल्थ वर्करनी पहिला डोस तर ८ हजार १८८ जणांनी दुसरा डोस घेतला. ९ हजार ९९१ फ्रंटलाइन वर्करनी पहिला डोस तर ८ हजार ९२९ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच ६० वर्षावरील १ लाख ३२ हजार ४८९ व्यक्तींनी पहिला डोस तर ९८ हजार ४४६ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. ४५ वर्षावरील १ लाख ६० हजार ६२३ नागरिकांनी पहिला डोस तर १ लाख १८ हजार ८६६ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील २ लाख ४४ हजार १७८ जणांनी पहिला डोस तर १ लाख ५५ हजार ७३३ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण ९ लाख ५० हजार २९८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

जिल्ह्याला लशींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात सध्या २० हजार ६०० डोस शिल्लक असून त्यापैकी ७ हजार ४०० कोविशिल्ड आणि १३ हजार २०० कोवॅक्सीनचे डोस आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply