खारवी समाज सहकारी पतसंस्थेची पहिली निवडणूक बिनविरोध

रत्नागिरी : येथील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेची पहिलीच पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी दीपक वि. वाघमारे यांनी हा निकाल जाहीर केला.

बिनविरोध निवडून आलेले मतदारसंघनिहाय सदस्य असे – रत्नागिरी (सर्वसाधारण) : सुधीर महादेव वासावे, कमलाकर धोंडू हेदवकर, वासुदेव भिकाजी वाघे, दिनेश बाबाजी डोर्लेकर. राजापूर : सर्वसाधारण) : मदन गुणाजी डोर्लेकर, गुहागर (सर्वसाधारण) : दिनेश काशिनाथ जाक्कर, रमेश केशव जाक्कर, संदीप विश्राम वणकर, कृष्णा पांडुरंग तांडेल. दापोली (सर्वसाधारण) : वैभव लक्ष्मण पालशेतकर. विशेष मागास प्रवर्ग : संतोष जनार्दन पावरी, महिला राखीव : सौ. ध्रुवी किशोर लाकडे, सौ. दीप्ती देवेंद्र कोलथरकर.

निवडणूक प्रक्रियेबाबत पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना झाली. अल्पावधीतच पतसंस्थेने जिल्ह्यात विश्वासार्ह पतसंस्था असे नाव कमावले आहे. स्थापनेनंतरची दोन वर्षे करोनामुळे ग्रासलेली आर्थिक वर्षे होती. दीर्घकालीन लॉकडाउनमुळे व्यवसाय ठप्प झाले होते. त्यामुळे अर्थकारणाची गती राखण्याचे आव्हान पतसंस्थेने यशसवीपणे पेलले. आर्थिक शिस्त, विश्वासार्हता, ग्राहक सेवा या गोष्टी जपत पतसंस्थेने आपला आर्थिक व्यवहार वर्धिष्णु केला आहे.

पतसंस्थेच्या स्थितीविषयी ते म्हणाले, ३ वर्षांत पतसंस्थेचे ३ हजार ९४४ सभासद झाले असून ५ कोटी ४५ लाखाच्या ठेवी, ४ कोटी २० लाखांची कर्जे, १ कोटी ८१ लाखाची गुंतवणूक, ६ कोटी ८१ लाखांचे खेळते भांडवल, लेखापरीक्षणाचा सलग ३ वर्षे अ वर्ग अशी पतसंस्थेची स्थिती आहे. सभासदांना पहिल्या वर्षांपासूनच लाभांश दिला जातो. तीन वर्षांत सोनेतारण कर्ज मुदतीत कर्ज खाते बंद करून एकही कर्ज खात्याचा लिलाव करावा लागला नाही. संस्थेचा संपूर्ण व्यवहार संगणकीकृत आहे. रत्नागिरी जिल्हा हे पतसंस्थेचे कार्यक्षेत्र आहे.

पतसंस्थेची पहिलीच पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे सर्व नवनियुक्त संचालक मंडळ सदस्य, समन्वय समिती सदस्य, प्रशासन वर्ग, सभासद, कर्जदार, ठेवीदार, पिग्मी खातेदार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply