रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ३ फेब्रुवारी) करोनाचे नवे ४६ रुग्ण आढळले, तर १०१ रुग्ण करोनामुक्त झाले. आज तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.
जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ८४ हजार २ झाली आहे, तर आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ८० हजार ६९० झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९६.०६ झाली आहे.
जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ३६० पैकी ३३० निगेटिव्ह, तर ३० पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या ७९८ पैकी ७८२ नमुने निगेटिव्ह, तर १६ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ लाख ५ हजार २३४ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ७६५ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ५२०, तर लक्षणे असलेले २४५ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ४७२ असून, संस्थात्मक विलगीकरणात २९३ जण आहेत. एकूण २८ रुग्णांची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये १४०, तर डीसीएचमध्ये १०५ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये ४८ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १६ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. अतिदक्षता विभागात ११ रुग्ण दाखल आहेत.
यापूर्वी मरण पावलेल्या दोन, तर आज मरण पावलेल्या एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आज झाली. त्यामुळे मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २,५१९ झाली आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर १.०४ टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.१३ टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.०० टक्के आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २३०, गुहागर १७९, चिपळूण ४८९, संगमेश्वर २२७, रत्नागिरी ८३५, लांजा १३२, राजापूर १६६. (एकूण २,५१९).
जिल्ह्यातील लसीकरण
रत्नागिरी जिल्ह्यात २ फेब्रुवारी रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाची ५४ सत्रे पार पडली. त्यात २४६ जणांनी लशीचा पहिला, तर १,३५८ जणांनी दुसरा डोस घेतला. १८ वर्षांवरच्या एकूण १,६०४ जणांचे लसीकरण झाले. याशिवाय १५ ते १७ वयोगटातील ७३४, तर १६९ जणांनी बूस्टर डोस घेतले. २ जानेवारीपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ४८ हजार ३४७ जणांचा पहिला, तर ८ लाख २३ हजार ६९० जणांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण १८ लाख ७२ हजार ३७ जणांचे लसीकरण झाले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड