सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे नवे २९ रुग्ण, पाच जणांचा मृत्यू

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे २९ रुग्ण आढळले, तर ७० रुग्ण करोनामुक्त झाले. आज पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार आज (दि. ६ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्यात २९ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ५७० रुग्णांपैकी १८ रुग्ण ऑक्सिजनवर असून ९ रुग्ण चिंताजनक अवस्थेत आहेत. आज ७० रुग्ण बरे होऊन घरी गेले.

आतापर्यंत जिल्ह्यात ५७ हजार १३३ रुग्ण बाधित आढळले, तर ५४ हजार ४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत मरण पावलेल्या रुग्णांची संख्या १ हजार ५१४ आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ५, दोडामार्ग ०, कणकवली ३, कुडाळ ६, मालवण १, सावंतवाडी १२, वैभववाडी ०, वेंगुर्ले २, जिल्ह्याबाहेरील ०.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ७०, दोडामार्ग ४६, कणकवली ५३, कुडाळ १४१, मालवण ८६, सावंतवाडी ८३, वैभववाडी २२, वेंगुर्ले ६६, जिल्ह्याबाहेरील १६.

आज घावनळे (कुडाळ) येथील ३५ वर्षीय पुरुष (हृदयविकार), माजगाव (सावंतवाडी) येथील ५२ वर्षीय पुरुष (मधुमेह, फुफ्फु विकार) आणि सांगवे (कणकवली) येथील ६५ वर्षीय पुरुष (उच्च रक्तदाब) अशा तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. याशिवाय यापूर्वी मरण पावलेल्या दोघांचा मृत्यू आज नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १,५१४ आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८४, दोडामार्ग – ४६, कणकवली – ३१६, कुडाळ – २५२, मालवण – २९७, सावंतवाडी – २१४, वैभववाडी – ८३, वेंगुर्ले – ११३, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply