वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्ताने रत्नागिरीत सोमवारी एकता दौड

रत्नागिरी : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने सोमवारी (दि. ३१ ऑक्टोबर) रत्नागिरीत एकता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून उद्या सकाळी ७ ते ८ या वेळेत राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात किमान १०० ठिकाणी एकता दौड आयोजित करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात येणार आहे.

रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण ते जिल्हाधिकारी कार्यालय यादरम्यान एकता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. या एकता दौडीमध्ये सहभाग घेण्यासाठी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्यासह सर्वसामान्य जनतेने सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply