मॅजिक गार्डनच्या वर्धापन दिनी पर्यटकांचे फोटो काढून स्वागत करणार

रत्नागिरी : गणपतीपुळे येथील मॅजिक गार्डनच्या वर्धापनदिनानिमित्ताने उद्या (दि. १९ डिसेंबर) तेथे भेट देणाऱ्या पर्यटकांचे मोफत फोटो काढून स्वागत करण्यात येणार आहे.

सुमारे दोन एकर जागेवर आंब्याच्या बागेमध्ये मॅजिक गार्डन नावाने सुंदर बाग तयार केली आहे. केवळ शहरांमधील मॉलमध्ये असणारे शो येथे येणाऱ्या पर्यटकांना निसर्गरम्य परिसरात अनुभवता येतात. डायनोसॉरची अनुभूती देणारा थ्रीडी शो, हसवता हसवता हातचलाखीने फसवणारा मॅजिक शो, घोस्ट इन कोकण हा थरारक हॉरर शो, लाइट आणि मिररचे सुंदर कॉम्बिनेशन असणारा इन्फिनिटी हॉल, सत्य आणि भ्रम यात हरवून टाकणारा मिरर इमेज आणि खिळवून ठेवणारा वोरटेक्स टनेल हे शो आणि असंख्य सेल्फी पॉइंट यामुळे मॅजिक गार्डन पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहे.

वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्युत रोषणाई आणि फुलझाडांनी गार्डन सजविण्यात आली आहे. चॉकलेट देऊन बालदोस्तांचे स्वागत करण्यात येणार असून येणाऱ्या पर्यटक प्रत्येक कुटुंबाचे मोफत फोटो काढून स्वागत केले जाणार आहे. मॅजिक गार्डनची आठवण म्हणून त्यांना ती फोटो प्रिंट मोफत दिली जाणार आहे, असे संचालक वैभव सरदेसाई (96375 88565) यांनी सांगितले. ते म्हणाले की, निसर्गपूरक पर्यटन आणि पर्यटनातून रोजगार निर्मिती हे आमचे ध्येय असून मॅजिक गार्डन हा पर्यटनाचा सकारात्मक पैलू आहे. या गार्डनसाठी राम शेंड्ये यांनी जागा उपलब्ध करून दिली असून त्यांचे नेहमीच सहकार्य असते, असेही ते म्हणाले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply