धन्वंतरी धर्मादाय संस्थेकडे आज उपलब्ध रक्तपिशव्या

रत्नागिरी : येथील धन्वंतरी धर्मादाय संस्थेमार्फत रत्नागिरीत परकार हॉस्पिटलमध्ये रक्त साठवणूक केंद्र सुरू आहे. तेथे आज, १० जानेवारी रोजी विविध गटाच्या १७ रक्तपिशव्या उपलब्ध आहेत.

धन्वंतरी धर्मादाय संस्थेचे रक्तसंकलन केंद्र म्हणजे रत्नागिरीमधील शासकीय रक्तपेढी, रेडक्रॉस रक्तपेढी यांच्याबरोबरच रत्नागिरीतील गरजूंना, रत्नागिरीकरांसाठीच एक तिसरा पर्याय आहे. रुग्ण तसेच रुग्णाचे नातेवाईक, त्यांचा मित्रपरिवार यांची रक्त मिळवताना होणारी तारांबळ, धावपळ कमी व्हावी हाच या रक्तपेढीचा उद्देश आहे.

सामाजिक बांधिलकीतूनच या संस्थेची अशी विचारसरणी आहे की, रत्नागिरीमधील रक्तपेढी आणि साठवणूक केंद्र यांच्यामध्ये व्यावसायिक स्पर्धा न राहता निव्वळ रुग्णसेवेसाठी नि:स्वार्थ सेवा असावी. त्याच दृष्टीने रत्नागिरीमधील रक्तदान शिबिरांमधून आतापर्यंत ३३६ रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या. तसेच आतापर्यंत ७२० रक्तपिशव्या रत्नागिरीकरांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.

आर्थिकदृष्ट्या रक्तपिशवी घेणे ज्यांना परवडत नसेल अशांना राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या (SBTC) मार्गदर्शक तत्त्वांनुसार अनेकांना निःशुल्क रक्तसुद्धा दिले जाते.

धर्मादाय संस्था संचालित रक्त साठवणूक केंद्रामधील आजचा (दि. १० जानेवारी) उपलब्ध रक्तसाठा –
A+ve १ पिशवी
B+ve ६ पिशव्या
O+ve ५ पिशव्या
Ab+ve ४ पिशव्या
O-ve १ पिशवी

अधिक माहितीसाठी संपर्क : अध्यक्ष – अजय भिडे (9511704655)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply