Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

माणगावच्या श्री देवी यक्षिणी वर्धापनदिनानिमित्त १२-१३ फेब्रुवारीला विशेष कार्यक्रम

Advertisements

माणगाव : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील माणगाव हे दत्तावतारी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांचे जन्मगाव. श्री देवी यक्षिणी ही माणगावची ग्रामदेवता. या श्री देवी यक्षिणीचा वर्धापनदिन सोहळा यंदा १२ आणि १३ फेब्रुवारी २०२३ (माघ कृष्ण सप्तमी आणि अष्टमी) रोजी साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदा वर्धापनदिनानिमित्त सग्रह सवास्तू देवी अथर्वशीर्ष याग केला जाणार आहे. कुंकुमार्चन, अभिषेक, पूजन, हवन आदी कार्यक्रमांसह दोन्ही दिवशी सायंकाळी आरती होणार आहे. सोमवारी (१३ फेब्रुवारी) दुपारी महाप्रसाद असून, सायंकाळी सात वाजता पुराणवाचनानंतर पालखीही निघणार आहे. तसेच, त्याच रात्री मातोंडच्या जय संतोषी माता पारंपरिक दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोगही सादर केला जाणार आहे.

सर्व भाविकांनी कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन देवीच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी यक्षिणी देवी पंचायतन स्थानिक सल्लागार समिती, समस्त मानकरी आणि ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे. श्री यक्षिणी देवीचे हे मंदिर पुरातन आणि दुर्मीळ असून, कोकणी काष्ठशिल्पकलेचा उत्तम नमुना येथे पाहायला मिळतो. या मंदिराच्या शेजारीच टेंब्ये स्वामी महाराजांचे जन्मस्थान आहे. तसेच, या मंदिराच्या समोरच टेंब्ये स्वामींनी स्थापन केलेले श्री दत्त मंदिर आहे. (या मंदिरांविषयीची माहिती वाचा पुढील लिंकवर…)

श्री देवी यक्षिणी

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version