रत्नागिरी : शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयातर्फे जिल्ह्यात शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लोककलांच्या माध्यमातून जागर करण्यास उत्साहाने प्रारंभ करण्यात आला. खेडशी (ता. रत्नागिरी) येथे १७ मार्च २०२३ रोजी पथनाट्याद्वारे जागर करण्यात आला.
सर्वसामान्य जनतेसाठीच्या योजना सोप्या आणि स्थानिक लोकभाषेत सांगितल्या की त्या लोकांपर्यंत लवकर पोहोचतात. यासाठीच रत्नागिरी जिल्ह्यात सहा विविध कलापथकांमार्फत जनजागृती सुरू आहे.
महिला आणि बाल विकास विभागांच्या योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, कृषी विभागाच्या योजना अशा विविध योजनांची माहिती दिली जाते. कुंडलिक कांबळे यांच्या अश्विनी कांबळे आणि पार्टी कलापथकाद्वारे खेडशी ग्रामपंचायत कार्यालयात नवनिर्माण महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून योजनांची माहिती दिली. या पथकाने पावस, गोळप, गावखडी, चांदेराई, हातखंबा, कापडगाव, पाली, नाणीज, खेडशी, चरवेली, कर्ला, जाकादेवी, करबुडे, निवळी १४ ग्रामपंचायतींमध्ये कार्यक्रम सादर केले.
खेडशी येथे सरपंच सौ. जान्हवी घाणेकर आणि अन्य सदस्य पथनाट्य सादरीकरणाला उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड