
रत्नागिरी : संस्कृतभारती संस्थेमार्फत पत्राद्वारे संस्कृत शिक्षण हे अभियान राबवले जात आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या अभियानातून घरबसल्या संस्कृतचा अभ्यास करता येतो. दर सहा महिन्यांनी एक, याप्रमाणे चार परीक्षांचा हा अभ्यासक्रम आहे. अभ्यासासाठी पुस्तक पोस्टाने घरी येते. यूट्यूबवर त्याचे अभ्यासाचे व्हिडिओ मिळतात. शिवाय दर आठवड्याला एक, असा ऑनलाइन वर्गही चालतो.
ज्यांना संस्कृत शिकण्याची आवड असेल, त्या इच्छुकांनी अधिक माहितीसाठी दक्षिण रत्नागिरी जिल्हा संयोजिका अक्षया अविनाश भागवत (9403564696) यांच्याशी संपर्क साधावा.
पत्राद्वारे संस्कृत योजनेत नावनोंदणी करण्यासाठी लिंक –
https://www.samskritabharati.in/correspondence
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड