रत्नागिरी : गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर याबाबतचे कायदे त्वरित व्हावेत, यासाठी रत्नागिरीत हिंदू गर्जना मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. येत्या शनिवारी (दि. १५ एप्रिल) सायंकाळी ४ वाजता हा मोर्चा श्री शिवतीर्थ मारुतीमंदिर येथून सुरू होईल.
आज पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी संतोष पावरी, राकेश नलावडे, केशव भट, संजय जोशी आणि चंद्रकांत राऊळ उपस्थित होते.
यावेळी सांगण्यात आले की मुंबईतील कॉल सेंटरमध्ये काम करणारी भगिनी श्रद्धा वालकर आमच्या डोळ्यांदेखत लव्ह जिहादला बळी पडली आणि तिचे ३५ तुकडे करून फेकण्यात आले. तरीही आम्ही शांत बसलो. आमची ही शांतता म्हणजे आमची मूकसंमती असे जगाने गृहीत धरले. आमच्या डोळ्यांसमोर सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून बिनदिक्कत अवैध प्रार्थनास्थळे बांधली जात आहेत. अवैध प्रार्थनास्थळांवरील भोंग्यातून पहाटेपासून रात्रीपर्यंत, कानाचे पडदे फाटेपर्यंत आवाज दिला जात आहे. तरीही आम्ही शांतच आहोत. आम्ही शांत म्हणून प्रशासनही शांतच आहे.
आज बांगलादेशी घुसखोरांना पकडण्याची गरज आहे. रोंहिग्यांची संख्या तर वाढतच चाललेली आहे. एनआरसीसारखा कायदा होणे गरजेचे आहे. पाकिस्तान व बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. जगातील हिंदूंची जबाबदारी आता आपल्यालाच घ्यावी लागणार आहे. देशात समान नागरी कायदा आणण्याची आवश्यकता आहे. लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि अवैध प्रार्थनास्थळावरील भोंग्यांनी उच्छाद मांडला आहे. हिंदू समाजाच्या लेकी-सुना कधी नव्हे एवढ्या असुरक्षित झाल्या आहेत. कोणती हिंदू मुलगी अथवा महिला लव्ह जिहादला कोणत्या क्षणी बळी पडेल, याची शाश्वती उरलेली नाही, असे यावेळी सांगण्यात आले.म्हणूनच आता प्रशासनाला जाब विचारण्यासाठी रत्नागिरीचा सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरणार आहे.
या मोर्चाला योगीताताई साळवी, धनंजय देसाई, विनय पानवळकर मार्गदर्शन करणार आहेत. मोर्चा मारुतीमंदिर, माळ नाका, जयस्तंभ, राम आळी, गोखले नाका येथून स्वा. लक्ष्मी चौक जाईल आणि तेथे समारोप होणार आहे. या मोर्चाला सर्व हिंदू बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. किमान दहा हजारांहून अधिक हिंदू रस्त्यावर उतरतील, असे सांगण्यात आले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

