पंडित राम मराठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाट्यगीत स्पर्धा

ठाणे : ठाण्याचे भूषण संगीतभूषण पंडित राम मराठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त खास संगीत मैफल होणार असून त्यासाठी रामविद्या गीतांजली नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी ३५ मराठी आणि हिंदी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. संगीत आणि नाट्य क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. येत्या २३ ऑक्टोबर २०२३ पासून त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात येणार आहे. यानिमित्त संस्कार भारती कोकण प्रांत ठाणे जिल्हा समिती आणि राम मराठे फाउंडेशन यांच्या संयुक्‍त विद्यमाने नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी स्पर्धकांनी राम मराठे यांनी भूमिका केलेल्या नाटकातील किंवा संगीतकार विद्याधर गोखले यांच्या नाटकातील नाट्यगीतांची निवड करायची आहे. स्पर्धेसाठी स्पर्धकांचे १२ ते १७ आणि १८ ते ३० असे दोन गट तयार करण्यात आले आहेत. स्पर्धा दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी स्पर्धकांना नाट्यगीत गायनाचे व्हिडीओ बनवून पाठवावे लागणार आहेत. व्हिडीओचा कालावधी जास्तीत जास्त पाच मिनिटांचा असणे आवश्यक आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना येत्या ६ ऑगस्टपर्यंत नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी शुल्क दोन्ही गटांसाठी अनुक्रमे दीडशे आणि अडीचशे रुपये ठेवण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धकांनी गौतमी पुजारे (९८६९४६४७७०), कीर्ती आगाशे (९७६६६२८५१५) आणि अनंत जोशी (९००४४६२२५२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पं. राम मराठे यांनी साकारलेल्या काही भूमिका

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply