त्रिवार जयजयकार रामा कार्यक्रमाने रत्नागिरीकर मंत्रमुग्ध

रत्नागिरी : त्रिवार जयजयकार या ३५ कलाकारांनी सादर केलेल्या सांगीतिक कार्यक्रमाला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे मंदिर आणि मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात स्थानिक करसेवकांचा हृद्य सन्मान रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे करण्यात आला. खातू नाट्यमंदिरात हा कार्यक्रम रंगला.

या कार्यक्रमात आनंद पाटणकर, नरेंद्र रानडे, श्रीधर पाटणकर, अभिजित भट, अभिजित नांदगावकर, चैतन्य परब, संध्या सुर्वे, अनुराधा गोखले, इरा गोखले, कश्मिरा सावंत, वैष्णवी जोशी, करुणा पटवर्धन, श्वेता जोगळेकर, तन्वी मोरे यांनी गायन केले. त्यांना तबलासाथ हेरंब जोगळेकर, पांडुरंग बर्वे, सचिन भावे, केदार लिंगायत, निखिल रानडे, राजू धाक्रस, हार्मोनियमसाथ विजय रानडे, चैतन्य पटवर्धन, निरंजन गोडबोले, संतोष आठवले, मंगेश मोरे यांनी केली. पखवाज राजा केळकर आणि मंगेश चव्हाण, की-बोर्ड राजू किल्लेकर, तालवाद्य साथ प्रा. सुहास सोहनी आणि हरेश केळकर यांनी केली. प्रभू राम, अयोध्या, करसेवक असे विविध संदर्भ घेत कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निवेदन निबंध कानिटकर आणि पूर्वा पेठे यांनी केले.

जयजय रामकृष्ण हरी गीताने कार्यक्रमाला सुरवात झाली. चैतन्य परबने आरंभी वंदीन आणि वैष्णवी जोशी हिने आज अयोध्या सजली ही गीते अप्रतिम म्हटली. त्यानंतर श्रीधर पाटणकरने ध्यान लागले रामाचे, कश्मिरा सावंतने ठुमक चलत व अभिजित भटने राम रंगी रंगले ही गीते स्पष्ट व दमदार आवाजात ऐकवली. इरा गोखले हिने राम राम जप करी सदा हे गीत अतिशय सुंदर रीतीने ऐकवले. अनुराधा गोखले यांनी श्रीराम चंद्र कृपाळू, ज्येष्ठ गायिका संध्या सुर्वे यांनी विश्वाचा विश्राम रे ही गीते लीलया सादर केली. अभिजित नांदगावकर यांच्या पहाडी आवाजातील सेतू बांधा रे या गीताने वातावरण राममय झाले.

नरेंद्र रानडे यांनी अविरत ओठी, तन्वी मोरे हिने काल मी रघुनंदन पाहिले, कश्मिरा सावंत व अभिजित भटने राम का गुणगान, करुणा पटवर्धन यांनी राम भजन कर मन, तर श्वेता जोगळेकरने विजय पताका ही गीते सुरेल आवाजात सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. ज्येष्ठ गायक आनंद पाटणकर यांनी संहारुनी अरी ही भैरवी सादर केली. त्रिवार जयजयकार या गीताने कार्यक्रमाचा सांगता झाली.

कार्यक्रमाची ध्वनी, प्रकाशव्यवस्था उदयराज सावंत, रंगमंच प्रशांत साखळकर, सजावट मिलिंद गुरव यांनी केली. याप्रसंगी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन, सचिव सतीश शेवडे, नियामक मंडळ सदस्य मनोज पाटणकर यांच्या हस्ते करसेवकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply