रत्नागिरी : गोव्यातील वास्को येथून कोकण रेल्वेमार्गावर अयोध्येला जाण्यासाठी दोन विशेष गाड्या फेब्रुवारी महिन्यात सोडण्यात येणार आहेत. येत्या १२ फेब्रुवारीला गाडीची पहिली फेरी सुटणार आहे.
आयआरसीटीसीवर या गाड्यांचे आरक्षण होणार आहे. गाडीविषयीचा तपशील असा – गाडी क्र. 06205 वास्को ते दर्शननगर (अयोध्या) आणि परत या मार्गावर सोमवार, १२ आणि २६ फेब्रुवारी रोजी सुटेले. वास्को येथून रात्री १० वाजून १० सुटणारी ही गाडी कुडाळ (सोमवारी मध्यरात्रीनंतर एक वाजून ४० मिनिटे), कणकवली (२.१२), वैभववाडी (२.५०), रत्नागिरी (मंगळवारी सकाळी ४.२५), संगमेश्वर (५.०८) चिपळूण (६.०८), खेड (६.५७) येथे थांबेल. ही गाडी सुटल्यापासून चौथ्या दिवशी, गुरुवारी पहाटे ३ वाजून २० मिनिटांनी अयोध्येला पोहोचेल.
परतीच्या प्रवासाकरिता ही गाडी शुक्रवार, १६ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी सकाळी ८ वाजता सुटेल. ही गाडी शनिवारी मध्यरात्रीनंतर (रविवारी पहाटे) एक वाजून २० मिनिटांनी खेड, २.०८ वाजता चिपळूण, २.४८ वाजता संगमेश्वर, पहाटे ३.४५ वाजता रत्नागिरी, ५.१० वाजता वैभववाडी, ५.३४ वाजता कणकवली आणि पहाटे ६ वाजता कुडाळला पोहोचेल.
देशभरातून ६६ स्थानकांवरून अशा गाड्या सुटणार आहेत. याचे आरक्षण राउंड ट्रिपमध्ये केले जाणार आहे. वेबसाइटवर बुकिंग उपलब्ध होईल. जे रामभक्त अयोध्येत जाऊ इच्छितात त्यांनी या गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य सचिन वहाळकर यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

