Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

आले रामराज्य…..! (भाग ४)

Advertisements

अयोध्येतील पहिले राम मंदिर बाराव्या शतकातील

येत्या ९ मार्च २०२४ पासून रत्नागिरीत “आले रामराज्य” या विषयावर होणार असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवाच्या निमित्ताने अयोध्येतील प्राचीन राम मंदिर कुणी बांधले होते, याविषयी ऊहापोह.

नमस्कार, जय श्रीराम!

अयोध्येतील ज्या राम मंदिराच्या पुनर्निर्माणाची चर्चा सध्या होत आहे, त्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील प्राचीन राम मंदिर कुणी बांधले होते, याचा अभ्यास करणेसुद्धा अगत्याचे ठरते.

अयोध्येतील प्राचीन राम मंदिर कुणी बांधले याचा उल्लेख विष्णू हरि शिलालेखात मिळतो. हा शिलालेख अयोध्येतील मंदिराच्या ठिकाणी उत्खननात सापडला होता. या शिलालेखात गढवाल राजा गोविंदचंद्र यांचा उल्लेख आहे. या राजाचा मंत्री अयनचंद्र याने इसवी सन ११३० मध्ये हे मंदिर बांधले. २९ छंदांचा उपयोग केलेल्या या शिलालेखातील २१ व्या ओळीत मंदिर बांधकामाचा उल्लेख आढळतो.

अयनचंद्राने मोक्ष मिळवण्यासाठी हे विष्णू हरीचे भव्य मंदिर बांधले, असा उल्लेख आहे. मोठ्या शिळा वापरून बांधलेल्या मंदिराच्या शिखरावर सोन्याचा कळस होता, असे मंदिराचे वर्णन केले आहे.

पंधराव्या शतकातील सत्योपाख्यान नावाच्या ग्रंथात एका कथेमध्ये अयोध्येचे, तेथील राम मंदिराचे आणि त्यातील राममूर्तीचे वर्णन आले आहे. ती कथा थोडक्यात अशी – एका सधन व्यापाऱ्याला संपूर्ण देशातील तीर्थक्षेत्रांची यात्रा करायची असते. त्यासाठी तो आपल्या गुरूंचे मार्गदर्शन घेतो. गुरू त्याला विदेह नावाच्या राज्याच्या राजाची गोष्ट सांगतात आणि त्या राजाच्या मार्गावर चाल, असा उपदेश करतात. या सत्योपाख्यान ग्रंथातील अयोध्येच्या वर्णनामध्ये विदेह राजाने अयोध्येला गेल्यावर काय केले, याचा उल्लेख आहे. ‘अयोध्येमध्ये शरयुतीरी स्वर्गद्वार नावाच्या घाटावर ब्राह्मणांना दक्षिणा देऊन राजा मंदिरात गेला. राजाने राममूर्तीला नमस्कार केला. राम निळ्या कमलाप्रमाणे दिसत होता आणि आपल्या आईच्या मांडीवर बसला होता. (सुरुवातीपासून त्याठिकाणी रामांची बालमूर्ती आहे, त्यामुळे त्याला रामलल्ला म्हटले गेले). प्रदक्षिणा करून राजाने मंदिरात सोन्याच्या घंटेने मधुर नाद केला आणि तुपाचा दिवा दाखवून नमस्कार केला.’

रामांच्या या बालरूपातील मूर्तीचे वर्णन अगस्त्य संहितेतसुद्धा आढळून येते. ही संहिता बाराव्या शतकात लिहिली गेली असावी, असे मानले जाते.

मातुरंगतं राम मिन्द्रनील समप्रभम्
कोमलांग विशालांकक्ष विद्युत वर्ण समावृतम्

सोन्याची घंटा, सोन्याचा कळस या वर्णनातून त्यावेळच्या अयोध्येतील मंदिराची संपन्नता दिसते. अशी संपन्न आणि पवित्र असलेली अयोध्या नगरी आणि तेथील प्रभू श्रीरामाचे मंदिर पुढच्या काळात पाडले गेले आणि ते पुन्हा उभे राहण्यासाठी उभ्या भारतवर्षाला सुमारे ५०० वर्षे वाट पाहावी लागली आणि संघर्ष करावा लागला. या संघर्षात निर्णायक भूमिका ठरली ती करसेवकांची किंवा कारसेवकांची…. कारसेवा म्हणजे काय? कारसेवक कोण होते ? यापूर्वी आपल्या देशात अशा प्रकारे कारसेवा कधी केली गेली होती? याबाबतची चर्चा पुढच्या भागात.

प्रवेशिकांविषयी …

कीर्तनसंध्येसाठी भारतीय बैठक मोफत असेल, तर खुर्चीसाठी देणगी सन्मानिका उपलब्ध असतील.
कीर्तनसंध्या २०२४ देणगी सन्मानिका मिळण्याची ठिकाणे पुढीलप्रमाणे

मानस जनरल स्टोअर्स, माळनाका, रत्नागिरी
९०११६६२२२०

धन्वंतरी आयुर्वेदिक औषधालय, मारुती, मंदिर, रत्नागिरी
उमेश आंबर्डेकर – ९४२३२९२४३७

सोहम एन्टरप्रायझेस, माळनाका, रत्नागिरी
नितीन नाफड – ८३०८८१३१५८

गुरुकृपा रेडिओ हाउस, टिळक आळी, रत्नागिरी
९८९०८२७००६

आगाशे स्टोअर्स आणि आगाशे फूडकोर्ट, साळवी स्टॉप, रत्नागिरी
९७३०३१०७९९

श्रीकांत सरदेसाई, रत्नागिरी
९४२११४२४९८

श्रीराम गोडबोले, पावस
९४२१२३८८२४

मकरंद करंदीकर, आरोग्य मंदिर, रत्नागिरी
९२८४७६७३७६

रत्नाकर जोशी, डिक्सन सप्लायर्स, जिल्हा परिषद बस स्टॉपजवळ,
मेन रोड, रत्नागिरी
९४२२०५२६१३

अनुश्रुती एंटरप्रायझेस-पितांबरी शॉपी, श्रीनगर, खेडशी, रत्नागिरी
अनिकेत कोनकर – ९४२३२९२१६२

महेंद्र दांडेकर, नरहर वसाहत, शिवाजीनगर, रत्नागिरी
७४१०१०४४३३

पराग गोगटे, केशर अमृततुल्य, जयस्तंभ, रत्नागिरी
९५५२५७०७२४

केळकर उपाहारगृह, अंगण प्लाझा, नाचणे रोड
९४२३०४७३४७

मधुसूदन बेंडे
९४२३८१७५११

राजन पटवर्धन, विष्णुनगर, नाचणे रोड, रत्नागिरी
९८६०३६६९९१

गंधराज ,समीर कार्लेकर, मारुती आळी, रत्नागिरी
९७६९२८७१७१

चिन्मय भागवत, नाचणे, रत्नागिरी
८८८८७९८८४५

श्रीनंदन केळकर, पऱ्ह्याची आळी, रत्नागिरी
७०८३९०९१०९

निबंध कानिटकर, कसबा, संगमेश्वर
९४२२३७६३२७

ओमकार बापट, रत्नागिरी
९४२२४३२७६४

…….
याशिवाय समर्पण अॅपवरूनही प्रवेशिका उपलब्ध आहेत. समर्पण अॅप डाउनलोड करण्यासाठी लिंक –

https://scan.samarpanpay.com/home/kirtansandhyaratnagiri

सोबतचा कोड स्कॅन करूनही देणगी प्रवेशिका उपलब्ध होऊ शकेल.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version