आले रामराज्य…..! (भाग ५)

करसेवा की कारसेवा?

येत्या ९ मार्च २०२४ पासून रत्नागिरीत “आले रामराज्य” या विषयावर कीर्तनसंध्या महोत्सव होणार आहे. त्यानिमित्ताने अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी झालेल्या करसेवेविषयी

नमस्कार, जय श्रीराम!

अयोध्येतल्या राम मंदिराच्या पुनर्निर्माणात निर्णायक भूमिका राहिली ती कारसेवकांची. पण कारसेवा म्हणजे काय? कारसेवा की करसेवा? काही ठिकाणी कारसेवा म्हटलं जातं, तर काहीजण करसेवा म्हणतात. मग यातलं बरोबर काय? खरंतर या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. संस्कृत भाषेमध्ये कर म्हणजे हात तर पंजाबी भाषेत कर या शब्दाचा अपभ्रंश कार असा झाला. “स्वतः च्या हातांनी आपल्या धर्मासाठी अथवा धर्मातील लोकांच्या रक्षणासाठी केलेली सेवा म्हणजे कारसेवा!” निःस्वार्थ हेतूने ही सेवा करणाऱ्यांना कारसेवक म्हटलं जातं.

कारसेवा या शब्दाचा उल्लेख अनेक शीख धर्मग्रंथात आढळतो. असं म्हटलं जातं की जालियनवाला बाग हत्याकांडानंतर सरदार उधमसिंग यांनी कारसेवा केली होती. तसंच १९८४ मध्ये अमृतसरमध्ये झालेल्या ऑपरेशन ब्लू स्टारनंतर सुवर्णमंदिरासाठी शीख धर्मीयांनी कारसेवा केली होती.

पण कारसेवा हा शब्द सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला तो रामजन्मभूमी आंदोलनाच्या निमित्ताने! विश्व हिंदू परिषद आणि राम जन्मभूमी मुक्ती समितीच्या माध्यमातून अनेक कारसेवक तयार झाले. विश्व हिंदू परिषदेकडून १९८४ मध्ये रामजन्मभूमी मुक्ती समिती स्थापन करण्यात आली. सगळ्या साधूसंतांना, कार्यकर्त्यांना एका मंचावर आणून राम जन्मभूमी मुक्तीसाठी कार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं. देशातील वेगवेगळ्या भागातील तरुण राम जन्मभूमीच्या जागी रामांचं मंदिर उभारण्यासाठी पुढे येऊ लागले. या कारसेवकांचे प्रमुख मार्गदर्शक होते गोरखपूरचे महंत अवैद्यनाथ! रामजन्मभूमीसाठी १९८९ मध्ये प्रथम कारसेवेला सुरुवात झाली, देशभरात सुमारे २.७० लाख ठिकाणी रामशिला पूजनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. ३० ऑक्टोबर १९९० ला अयोध्येत कारसेवा करण्याचा निर्णय जाहीर झाला. त्यानंतर दुसरी कारसेवा झाली ०६ डिसेंबर १९९२ रोजी. त्या पुढचा इतिहास सर्वाना ठाऊक आहेच.

आज अयोध्येत उभं राहिलेलं भव्य राम मंदिर अनेक ज्ञात-अज्ञात रामभक्तांच्या बलिदानामुळे उभं राहू शकलं. त्यामुळे आज नवीन मंदिराच्या निर्माणाचा आनंद साजरा करताना त्यातल्या अज्ञात रामभक्तांचं स्मरण करायला हवं. त्या हुतात्म्यांना वंदन!

  • निबंध कानिटकर, संगमेश्वर
    (संपर्क : ९४२२३७६३२७)
  • ……

प्रवेशिकांविषयी …

कीर्तनसंध्येसाठी भारतीय बैठक मोफत असेल, तर खुर्चीसाठी देणगी सन्मानिका उपलब्ध असतील.
कीर्तनसंध्या २०२४ देणगी सन्मानिका मिळण्याची ठिकाणे पुढीलप्रमाणे

मानस जनरल स्टोअर्स, माळनाका, रत्नागिरी
९०११६६२२२०

धन्वंतरी आयुर्वेदिक औषधालय, मारुती, मंदिर, रत्नागिरी
उमेश आंबर्डेकर – ९४२३२९२४३७

सोहम एन्टरप्रायझेस, माळनाका, रत्नागिरी
नितीन नाफड – ८३०८८१३१५८

गुरुकृपा रेडिओ हाउस, टिळक आळी, रत्नागिरी
९८९०८२७००६

आगाशे स्टोअर्स आणि आगाशे फूडकोर्ट, साळवी स्टॉप, रत्नागिरी
९७३०३१०७९९

श्रीकांत सरदेसाई, रत्नागिरी
९४२११४२४९८

श्रीराम गोडबोले, पावस
९४२१२३८८२४

मकरंद करंदीकर, आरोग्य मंदिर, रत्नागिरी
९२८४७६७३७६

रत्नाकर जोशी, डिक्सन सप्लायर्स, जिल्हा परिषद बस स्टॉपजवळ,
मेन रोड, रत्नागिरी
९४२२०५२६१३

अनुश्रुती एंटरप्रायझेस-पितांबरी शॉपी, श्रीनगर, खेडशी, रत्नागिरी
अनिकेत कोनकर – ९४२३२९२१६२

महेंद्र दांडेकर, नरहर वसाहत, शिवाजीनगर, रत्नागिरी
७४१०१०४४३३

पराग गोगटे, केशर अमृततुल्य, जयस्तंभ, रत्नागिरी
९५५२५७०७२४

केळकर उपाहारगृह, अंगण प्लाझा, नाचणे रोड
९४२३०४७३४७

मधुसूदन बेंडे
९४२३८१७५११

राजन पटवर्धन, विष्णुनगर, नाचणे रोड, रत्नागिरी
९८६०३६६९९१

गंधराज ,समीर कार्लेकर, मारुती आळी, रत्नागिरी
९७६९२८७१७१

चिन्मय भागवत, नाचणे, रत्नागिरी
८८८८७९८८४५

श्रीनंदन केळकर, पऱ्ह्याची आळी, रत्नागिरी
७०८३९०९१०९

निबंध कानिटकर, कसबा, संगमेश्वर
९४२२३७६३२७

ओमकार बापट, रत्नागिरी
९४२२४३२७६४

…….
याशिवाय समर्पण अॅपवरूनही प्रवेशिका उपलब्ध आहेत. समर्पण अॅप डाउनलोड करण्यासाठी लिंक –

https://scan.samarpanpay.com/home/kirtansandhyaratnagiri

सोबतचा कोड स्कॅन करूनही देणगी प्रवेशिका उपलब्ध होऊ शकेल.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply