आले रामराज्य…..! (भाग ३)

कशी होती अयोध्येची नगररचना?

येत्या ९ मार्च २०२४ पासून रत्नागिरीत “आले रामराज्य” या विषयावर होणार असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवाच्या निमित्ताने अयोध्यानगरीच्या इतिहासाविषयी थोडेसे!

नमस्कार, जय श्रीराम!

“अतृप्तीचा कुठे न वावर, नगरी, घरी, अंतरी” असं ज्या स्थानाचं वर्णन ग. दि. माडगूळकरांनी केलं आहे, ती अयोध्या नगरी. अयोध्येला अपराजिता असंसुद्धा म्हटलेलं आहे. कोणीही योद्धा जिंकू शकत नाही अशी ती अ – योध्या…

अथर्ववेदात अयोध्येच्या प्राचीन नगररचनेचा उल्लेख आला आहे.
अष्टचक्रा नवद्वारा देवानां पूरयोध्या।
तस्यां हिरण्मयः कोशः स्वर्गो ज्योतिषावृतः।।

आठ वर्तुळात वसलेली आणि नऊ महाद्वार असलेली ही अयोध्या नगरी साक्षात देवांची नगरी आहे. तिच्या कोशात असलेला सोन्याचा खजिना जणू प्रकाशमान आहे. आठ वर्तुळे अशी नगररचना असलेली अयोध्या ही आधुनिक नगररचना कशी असावी, याचा एक वस्तुपाठ आहे.

इसवी सन १८५० मध्ये लंडन येथे नगररचनेच्या संदर्भात एक परिषद झाली. या परिषदेत सॅम्युएल क्लेग या अभियंत्याने अयोध्येच्या प्राचीन नगररचनेविषयी माहिती दिली. सॅम्युएल लिहितो – “अयोध्या ही शरयू नदीच्या तीरावर वसलेली मनूने निर्माण केलेली नगरी आहे. या नगराची लांबी १२ योजने आणि रुंदी ३ योजने एवढी आहे. या नगरातील रस्ते प्रशस्त होते आणि ही नगरी तटबंदीने संरक्षित केलेली होती. (Civil Engineer & architect’s Journal scientific & railway Gazetter – Vol 13 ). (काही वेळा आपल्याकडील माहितीच्या पेक्षा सातासमुद्रापलीकडून आलेल्या माहितीवर आपला पटकन विश्वास बसतो, म्हणून त्याचाही दाखला दिला आहे.)

एवढ्या संपन्न नगरीचे पुनर्निर्माण इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकात पुष्यमित्र शुंग या राजाने केले असा उल्लेख आहे. शुंग घराण्याचे अयोध्येवर राज्य होते हे सांगणारा शिलालेख उपलब्ध आहे. या लेखाला धनदेवाचा अयोध्या लेख असे म्हणतात. धनदेव हा पुष्यमित्राच्या वंशावळीतील सहावा राजा. याने इसवी सनपूर्व पहिल्या शतकात २८ वर्षे अयोध्येवर राज्य केले.

अशी अयोध्या ही संपन्न नगरी रामजन्मभूमी आहे. आज ज्या राम मंदिराच्या पुनर्निर्माणाचा आनंद आपण सर्वजण साजरा करत आहोत, त्या ठिकाणी पूर्वी असलेले राम मंदिर कसे होते? ते कुणी बांधले होते? त्यातील मूर्ती कशी होती? याबाबतची चर्चा पुढच्या भागात.

  • निबंध कानिटकर, संगमेश्वर
    (संपर्क : ९४२२३७६३२७)
  • ……

प्रवेशिकांविषयी …

कीर्तनसंध्येसाठी भारतीय बैठक मोफत असेल, तर खुर्चीसाठी देणगी सन्मानिका उपलब्ध असतील.
कीर्तनसंध्या २०२४ देणगी सन्मानिका मिळण्याची ठिकाणे पुढीलप्रमाणे

मानस जनरल स्टोअर्स, माळनाका, रत्नागिरी
९०११६६२२२०

धन्वंतरी आयुर्वेदिक औषधालय, मारुती, मंदिर, रत्नागिरी
उमेश आंबर्डेकर – ९४२३२९२४३७

सोहम एन्टरप्रायझेस, माळनाका, रत्नागिरी
नितीन नाफड – ८३०८८१३१५८

गुरुकृपा रेडिओ हाउस, टिळक आळी, रत्नागिरी
९८९०८२७००६

आगाशे स्टोअर्स आणि आगाशे फूडकोर्ट, साळवी स्टॉप, रत्नागिरी
९७३०३१०७९९

श्रीकांत सरदेसाई, रत्नागिरी
९४२११४२४९८

श्रीराम गोडबोले, पावस
९४२१२३८८२४

मकरंद करंदीकर, आरोग्य मंदिर, रत्नागिरी
९२८४७६७३७६

रत्नाकर जोशी, डिक्सन सप्लायर्स, जिल्हा परिषद बस स्टॉपजवळ,
मेन रोड, रत्नागिरी
९४२२०५२६१३

अनुश्रुती एंटरप्रायझेस-पितांबरी शॉपी, श्रीनगर, खेडशी, रत्नागिरी
अनिकेत कोनकर – ९४२३२९२१६२

महेंद्र दांडेकर, नरहर वसाहत, शिवाजीनगर, रत्नागिरी
७४१०१०४४३३

पराग गोगटे, केशर अमृततुल्य, जयस्तंभ, रत्नागिरी
९५५२५७०७२४

केळकर उपाहारगृह, अंगण प्लाझा, नाचणे रोड
९४२३०४७३४७

मधुसूदन बेंडे
९४२३८१७५११

राजन पटवर्धन, विष्णुनगर, नाचणे रोड, रत्नागिरी
९८६०३६६९९१

गंधराज ,समीर कार्लेकर, मारुती आळी, रत्नागिरी
९७६९२८७१७१

चिन्मय भागवत, नाचणे, रत्नागिरी
८८८८७९८८४५

श्रीनंदन केळकर, पऱ्ह्याची आळी, रत्नागिरी
७०८३९०९१०९

निबंध कानिटकर, कसबा, संगमेश्वर
९४२२३७६३२७

ओमकार बापट, रत्नागिरी
९४२२४३२७६४

…….
याशिवाय समर्पण अॅपवरूनही प्रवेशिका उपलब्ध आहेत. समर्पण अॅप डाउनलोड करण्यासाठी लिंक –

https://scan.samarpanpay.com/home/kirtansandhyaratnagiri

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply