सिंधुरत्न फाउंडेशनतर्फे दिविजा वृद्धाश्रमात पितृपक्षानिमित्त अन्नदान

निकेत पावसकर, कणकवली : सिंधुरत्न फाउंडेशनच्या अध्यक्षा अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी असलदे (ता. कणकवली) येथील स्वस्तिक फाउंडेशन संचलित दिविजा वृद्धाश्रमात पितृपक्षानिमित्त अन्नदान केले. गेली अनेक वर्षे त्या हे समाजकार्य निःस्वार्थीपणे करत आहेत.


असलदे (ता. कणकवली) : द्विविजा वृद्धाश्रमात सिंधुरत्न फाउंडेशनच्या अध्यक्षा अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी पितृपक्षानिमित्त अन्नदान आणि आर्थिक मदत केली.

उपेक्षित गरीब, गरजू, अपंग व्यक्तींकरिता कार्य करणारी स्वस्तिक फाउंडेशन ही कोकणातील अग्रेसर संस्था आहे. असलदे येथील दिविजा वृद्धाश्रम हा स्वस्तिक फाउंडेशन या संस्थेचा मुख्य उपक्रम आहे. या आश्रमात ५६ आजी-आजोबा आहेत. या सर्वांचे वेळच्या वेळी सर्व व्यवस्थित करणे खूप कष्टाचे आणि जोखमीचे आहे. त्यासाठी संचालक आणि कर्मचाऱ्यांना खूप मेहनत घ्यावी लागते. अनेक सामाजिक संस्था, कार्यकर्ते आश्रमाला यथाशक्ती मदत करत असतात. असाच एक उपक्रम अक्षता कांबळी पितृपक्षाच्या निमित्ताने राबवत आहेत.

अक्षता कांबळी यांनी मालवणी गजाली सांगून आजीआजोबांना खूप हसवले. यावेळी त्यांच्यासमवेत सौ. मीलन पाटील, अर्चना राणे, सिद्धेश कांबळी, रविकिरण शिरवलकर, अमोल राणे, अनिल कांबळी उपस्थित होते. आश्रमाचे संचालक संदेश शेट्ये आणि सर्व कर्मचाऱ्यांनी कांबळी यांचे आभार मानले. अक्षता कांबळी यांनी यावेळी वृद्धाश्रमाला आर्थिक मदतही केली.

यावेळी जानवलीच्या आदर्श नगरातील अमोल राणे यांनीही अन्नदान केले.

पितृपक्ष वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याविषयी माहिती यावेळी देण्यात आली. परंपरागत अनेकजण घरीच अनेकांना जेवण देतात. आज ज्यांना गरज आहे अशा वृद्धाश्रमातील आजीआजोबांना अन्नदान केले, तर त्यांचे आशीर्वाद अनेकांना मिळतील. त्यामुळे आपल्या पितरांच्या नावाने द्विविजा वृद्धाश्रमात अन्नदान, वस्तू दान किंवा आर्थिक मदत करावे, असे आवाहन करण्यात आले.

कौटुंबिक प्रवाहातून बाहेर पडलेल्या या ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी संस्था आपले धार्मिक सण मोठ्या उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरे करते. गुढीपाडवा, आषाढी एकादशी, रक्षाबंधन, गोपाळकाला, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, तुलसीविवाह, त्याबरोबर मार्गशीर्षात सत्यनारायण पूजा, मकरसंक्रांत, होळी इत्यादी सणसमारंभ उत्साहपूर्ण वातावरणात आनंदाने साजरे केले जातात. 

दिविजा वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी अद्ययावत ग्रंथालय, मनोरंजनाची साधने, कॅरम आदी उपलब्ध असून, ऑनलाइन योग सेशन्सही आयोजित केली जातात. सद्यस्थितीत आश्रमात जागेची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे नवीन अद्ययावत वास्तू उभारण्याचा संकल्प संस्थेने केला आहे. त्यामुळे दानशूर व्यक्तींकडे मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. सजग नागरिकांकडून येणाऱ्या मदतीतून आधुनिक स्वरूपाचा आश्रम उभारण्यात येणार आहे. 

‘पितृपंधरवड्यात पितरांचे स्मरण केले जाते. त्या निमित्ताने दिविजा वृद्धाश्रमातील गरजू आजी-आजोबांना अन्नदान करून आपल्या पितरांचे स्मरण करावे. गरजवंतांना अन्नदान करून पितृपक्ष नव्या पद्धतीने साजरा करून वेगळा पायंडा पाडावा,’ असे आवाहन वृद्धाश्रमाकडून करण्यात आले आहे.

दानशूर व्यक्तींनी वृद्धाश्रमास सढळ हस्ते मदत करून आश्रमाच्या पुनर्बांधणीसाठी हातभार लावावा. वर्षभर केव्हाही मदत करता येतेच; मात्र पितृपंधरवड्याला वेगळे महत्त्व असल्याने त्या निमित्ताने वृद्धाश्रमाला मदत करून पितरांच्या स्मरणाबरोबरच वृद्धांच्या सेवेला हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणीही इच्छुक व्यक्ती प्रियजनांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, अन्नदानाच्या स्वरूपात किंवा आर्थिक मदत देऊन आश्रमाला मदत करू शकते.

संपर्क :
संदेश शेट्ये : 9223221400  
दीपिका रांबाडे :  8530700102 
अविनाश फाटक : 9820218269  
अस्मि राणे : 8080071626

मदतीसाठी बँक खात्याचा तपशील

Name : Swastik Foundation 
Account No. : 62483160440
Bank name : State Bank of India
IFSC code : SBIN0015445
Branch : Prabhadevi, Mumbai

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply