चौसष्टावी हौशी राज्य नाट्य स्पर्धा
प्राथमिक फेरी रत्नागिरी केंद्र
स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी
दि. २-१२-२०२५
नाटक – अनपेक्षित
संस्था – श्री लक्ष्मीकांत विविध कार्यकारी को-ऑप. सोसायटी, भाट्ये, रत्नागिरी
लेखक-दिग्दर्शक – नीलेश जाधव
मोबाइलच्या अयोग्य वापराचे दुष्परिणाम दाखविणारी कथा
मोबाइलच्या जगात माणूस जवळ आला; मात्र सोशल मीडियामुळे होणारे दुष्परिणामही दिवसेंदिवस वाढत आहेत. फसवणूक, विविध आमिषे, धमक्या या त्यातील मोठ्या समस्या; त्यातही वाढ झाली आहे. सोशल मीडिया हे संवादाचे साधन झाले असले, तरीही दुसऱ्या बाजूला ऑनलाइन संवादातून माणसाला मरणाच्या दारात नेऊन ठेवण्याचे प्रकार घडत आहेत. याचेच चित्रण राज्य नाट्यस्पर्धेत भाट्ये येथील श्री लक्ष्मीकांत विविध कार्यकारी को. ऑप. सोसायटीने अनपेक्षित या नाटकातून घडविले. लेखक-दिग्दर्शक नीलेश जाधव यांच्या संकल्पनेतून हे नाटक उतरले आहे.
आजकालच्या जीवनात मोबाइल ही अत्यावश्यक बाब झाली असली, तरी माणसाच्या जीवनप्रवासात अनवधानाने किंवा सवय म्हणून म्हणा, अनेक अडचणी निर्माण केल्या आहेत. याचीच कथा ‘अनपेक्षित’ या नाटकाच्या संहितेतून मांडली आहे.
तीन वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये सोशल मीडियामुळे झालेला अनवस्था प्रसंग त्यात दाखवण्यात आला आहे. अजिंक्य, त्याचे वडील आणि विकास पाटील यांची मुलगी निहारिका. त्याचे वडील पोलीस खात्यात असतात, तर काका विकास पाटील हे त्याच्या वडिलांचे चांगले मित्र असतात. हे एक कुटुंब आहे. महाविद्यालयीन तरुण अजिंक्य मोबाइलमुळे फसवणूक करणाऱ्या मुलींच्या जाळ्यात अडकतो. अजिंक्य अचानक भयावह वागू लागतो. वडिलांना त्याचे वागणे पटत नाही. एके दिवशी विकास पाटील यांची मुलगी निहारिका अजिंक्यच्या घरी येते. त्यावेळी अजिंक्य तिला मनाला न पटणारा स्पर्श करतो. निहारिका हे वडिलांना सांगते. विकास पाटील आणि निहारिका अजिंकच्या घरी येतात त्यावेळी हा प्रकार उघड होतो. अजिंक्यचे वडील त्याचा फोन घेऊन बघतात, तर त्याच्या अकाउंटला मोठी हजारांची रक्कम जमा झालेली असते. त्या रॅकेटचा अजिंक्यला सारखा फोन येत असतो. त्यामुळे अजिंक्य भयभीत होतो. त्याचे वडील मोबाइलवरून त्या रॅकेटमधील म्होरक्याला समजावतात, पैसे परत करतो म्हणून सांगतात; पण ते शक्य होत नाही.
दुसरे कुटुंब अनिकेत आणि त्याचे मम्मी-पप्पा, राजेश, अमेय, प्रणय यांचे. अनिकेत उत्तम नृत्य करणारा असतो. त्याचा संघर्ष सुरू असतो. त्याच्याकडे मोबाइल नसतो; तो वडिलांकडे असतो. वडील मात्र मोबाइलमुळे एका महिलेच्या जाळ्यात अडकतात. ती पैशाची मागणी करते. त्यामुळे हे कुटुंबही मानसिक आघातात सापडले.
तिसऱ्या कुटुंबातील अमेय काका आणि प्रणयचा मामा हे मोबाइल रॅकेटमधील मुलीच्या जाळ्यात अडकतात आणि आत्महत्या करतात. इथेच नाटकाचा पूर्वार्ध संपतो.
उत्तरार्ध वेगळ्याच नेपथ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू होतो. परिस्थितीशी झगडणारा राजेश झटकन मोठे होण्यासाठी मोबाइलचा वापर करून लोकांना आमिषे दाखवून मुलींचा वापर करून दिवसाला २५ हजार मिळवतो. वेगवेगळ्या कुटुंबांना त्रास देणाऱ्या, मुलींना पुढे करून पैसे मिळविणाऱ्या रॅकेटचा सूत्रधार असतो. अक्षय-जॉय डिसोजा कुटुंबांना त्रास राजेशला पकडण्यासाठी जंग जंग पछाडतात. शेवटी एका गार्डनमध्ये डबा खात असताना जॉय डिसोजा म्हणजेच इन्स्पेक्टर सुशांत गायकवाड आणि अक्षय हवालदार राजेशला पकडतात. अशी कथा या अनपेक्षित नाटकात साकारण्यात आली आहे. मोबाइलमुळे होणारे दुष्परिणाम त्यात दाखवण्यात आले आहेत.
श्रेयनामावली
नेपथ्य : नीलेश जाधव
गीतकार : अनिकेत मोरे
संगीत : रोहित कांबळे
प्रकाशयोजना : अक्षद मालेगावकर
वेशभूषा : मयूरा जाधव.
रंगभूषा : रोहित कांबळे.
पात्र परिचय
अजिंक्य : गणेश राजेशिर्के
अजिंक्यचे वडील – योगेश पाटील
विकास पाटील : डॉ. प्रदीप निंदेकर
अनिकेत : अनिकेत मोरे
अनिकेतचे पप्पा : नितीन म्हापसेकर
अनिकेतची मम्मी : मयूरा जाधव
राजेश : विवेक शिंदे
अमेय : अमेय हळदे
प्रणय : प्रणय हळदे
निहारिका : भूमिका अंगवलकर
अक्षय : विनायक निवळकर
जॉय डिसोझा : नीलेश जाधव
तिकीट विक्री
तिकीट विक्री
रु. १५ …. १७२ तिकिटे = ३,१३५/- , रु. १० ….८८८ तिकिटे = ८८८/- एकूण तिकीट विक्री रु. ३,४६०/-
प्रेक्षक उपस्थिती – तिकीट धारक – ३०९, पत्रकार – ६, सन्मानिका धारक – २३. एकूण प्रेक्षक उपस्थिती – ३३८.











कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

