चौसष्टावी हौशी राज्य नाट्य स्पर्धा
प्राथमिक फेरी रत्नागिरी केंद्र
स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी
दि. ३-१२-२०२५
नाटक – एक्सपायरी डेट
संस्था – श्री शिवाई सहकारी पतसंस्था मर्यादित, येळवण, राजापूर
पात्र परिचय
लेखक – चैतन्य सरदेशपांडे
दिग्दर्शक – चिंतन लांबे
कलाकार –
नाना – चिंतन लांबे
आई – पल्लवी माने
म्हातारी – अर्चना पाटील
राजू – बाबली मयेकर
डॉक्टर – नयन जोशी
मॅनेजर – निखिल मेस्त्री
अजय- शुभम दाभाडे
तंत्रज्ञ-
नेपथ्य – विजय मिरगे, दीपक नगराळे
संगीत संयोजन- हरेश बने, प्रथमेश नाईक
प्रकाशयोजना – साई शिर्सेकर, वेशभूषा – गौरवी भोसले, सोनाली राजे,
रंगभूषा – उदयराज तांगडी
रंगमंच व्यवस्था – श्रद्धा माळवदे, पूजा देशमुख, प्राची रिंगे, यज्ञा सावंत
विशेष आभार – श्रीरंग नाट्य संस्था, रत्नागिरी
मृत्यूचाही इव्हेंट करण्याच्या पाश्चात्त्य विचारांचा विनोदी वेध
पाश्चिमात्य जीवनशैलीचे आणि वृद्ध-पालकांविषयी बदललेल्या दृष्टिकोनाचे दर्शन ‘एक्स्पायरी डेट’ या नाटकातून लेखक चैतन्य सरदेशपांडे यांनी विनोदी शैलीने मांडले आहे. माणसाच्या मृत्यूची तारीख कुणीही ठरवू शकत नाही. पण ती ठरवून ठेवून मृत्यूचाही इव्हेंट करण्याच्या संकल्पनेला विनोदी जोड देत श्री शिवाई सहकारी पतसंस्था, येळवण यांनी राज्य नाट्यस्पर्धेत हे नाटक सादर केले.
मरण पावलेल्या व्यक्तीचा डीजे वाजवून साजरा करण्याच्या प्रसंगाने नाटकाची सुरुवात होते. मरण पावलेल्या त्या व्यक्तीची पत्नीही रडण्याचा, शोकाचा आविष्कार घडविते. इमारतीतील रहिवासीही मिश्कील स्वभावाचे. लग्नात बँडबाजा असतो तसा मृत्यूनंतरही इथे डीजे आणि बँडबाजा वाजवला जातो.
नाना कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हे वयोवृद्ध दांपत्य. त्यांचा मुलगा अजय परदेशात पत्नी आणि मुलांसोबत राहतो. तो व्हिडीओ कॉलवरून आईवडिलांच्या सतत संपर्कात असतो. पण आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या मृत्यूची वाट पाहण्यासाठीच तो संपर्क साधत असतो. अचानक मृत्यू झाला, तर अंत्यसंस्काराला परदेशातून येता येणार नाही, म्हणून तो आईकडून वडिलांची ‘एक्स्पायरी डेट’ काढण्याची विनंती करतो. त्यासाठी परस्परच डॉक्टरलाही पाठवून देतो. आधी वडील तयार होत नाहीत, पण नाइलाजाने आपल्या मृत्यूची तारीख काढायला तयार होतात. ती ठरल्यानंतर ‘मृत्यूच्या तारखे’साठी लग्नपत्रिकेप्रमाणे पत्रिका छापली जाते. घरात मंगलकार्याची धांदल, रडणारे लोक, गिटार, सनईवाले यांना आधीच बोलावण्यात येते.
निर्धारित दिवस जवळ येत असतो. सारेच तयारीत असतानाच, रिहर्सलदरम्यान नाना निपचित पडतात. सर्वांना वाटते, ‘नाना गेले.’, म्हणून रडारड सुरू होते. डॉक्टर तपासणी करतात. ही बातमी इमारतीतील काही रहिवासी अजयला कळवतात अजय येतो. मृत्यूचा उत्सव साजरा करायला सज्ज होतो. पण डीजेचा आवाज सुरू होताच नाना उठून बसतात. अखेरीस मुलगा पुन्हा न येण्यासाठी परदेशात परत निघून जातो.
तिकीट विक्री
रु. १५ – १२० तिकिटे = १,८००/-
रु. १० – ९६ तिकिटे = ९६००/-
एकूण तिकीट विक्री रु. २,७६०/-
प्रेक्षक उपस्थिती – तिकीट धारक. २१६, पत्रकार ५, सन्मानिका धारक ११. एकूण २३२.






नाटकाची झलक
भाग १ – https://youtu.be/-Mq-Z0fP2D8
भाग २ – https://youtu.be/Mzq-eMVxqYw
भाग ३ – https://youtu.be/NYxStSFpFcI
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

