रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ३३३३ रुग्णांची करोनावर मात; सिंधुदुर्गात ११०३ जण बरे

रत्नागिरी : करोनाच्या आजारातून आज जिल्ह्यातील ७३ जणांना बरे वाटले. त्यामुळे त्यांना घरी पाठविण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत ३३३३ जण करोनामुक्त झाले आहेत. हे प्रमाण ६१.६१ टक्के आहे. आज नवे १४१ रुग्ण सापडले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ५४०९ झाली आहे. सिंधुदुर्गात आज ८८ नवे रुग्ण सापडले.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज दोघा महिलांसह तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या १५६ झाली असून, मृतांचे प्रमाण २.८८ टक्के आहे. आज खेड येथील ३३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. खेड तालुक्यातीलच ४८ वर्षीय आणि दापोली तालुक्यातील ५९ वर्षीय महिलेचा मृत्यू आज नोंदविला गेला.

मुंबईसह परजिल्ह्यातून जिल्ह्यात आल्यामुळे सध्या ५४०३ जण होम क्वारंटाइनमध्ये आहेत.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१० सप्टेंबर) आणखी ८८ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता २१७४ झाली आहे. आतापर्यंत ११०३ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १०३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप २७८ अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ३३ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ८६९७ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत. नागरी क्षेत्रात संस्थात्मक विलगीकरणात १२ हजार ३०८ व्यक्ती आहेत.

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply