रत्नागिरीत १७९ नवे करोनाबाधित; सिंधुदुर्गात ७५ जणांची वाढ

रत्नागिरी : आज जिल्ह्यात करोनाचे नवे १७९ रुग्ण सापडले. त्यामुळे आता जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ५५८८ झाली आहे. सिंधुदुर्गात ७५ नवे रुग्ण सापडल्याने तेथील रुग्णसंख्या २२४९ झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
आज सापडलेल्या रुग्णांची बाधा आरटीपीसीआर आणि अँटीजेन चाचण्यांमध्ये निश्चित झाली असून त्यांचा तपशील असा – आरटीपीसीआर – मंडणगड ९, दापोली १, खेड १८, गुहागर ८, चिपळूण १८, संगमेश्वर १०, रत्नागिरी १९, लांजा आणि राजापूर प्रत्येकी १ (एकूण ८५). रॅपिड अँटीजेन टेस्ट – दापोली २, खेड २, गुहागर २४, चिपळूण ३९, रत्नागिरी २० आणि लांजा ७ (एकूण ९४).

आज चिपळूण येथील एका ७० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १५७ झाली आहे. तालुकानिहाय मृतांची आकडेवारी अशी – मंडणगड २, खेड २०, दापोली २३, चिपळूण ३५, गुहागर ४, संगमेश्वर १४, रत्नागिरी ४६, लांजा ५, राजापूर ८ (एकूण १५७).

मुंबईसह परजिल्ह्यातून जिल्ह्यात आल्यामुळे सध्या ५१४८ जण होम क्वारंटाइनमध्ये आहेत.

आज रत्नागिरी तालुक्यातील पुढील क्षेत्रे करोनाबाधित क्षेत्रे म्हणून जाहीर करण्यात आली आहेत : वाटद, खंडाळा, गावखडी तोडणकरवाडी, जे. के. फाइल्स, पांडुरंग सोसायटी, विनम्र नगर, गोडाऊन स्टॉप, नाचणे, स्वरूपानंद वसाहत, गयाळवाडी, नरबे, विमानतळ, आदिष्टी नगर, फिनोलेक्स कॉलनी, गोळप सडा कातळ कॉलनी, मयूरेश अपार्टमेंट, समर्थनगर, कुरबुडेकोंड, खापरेवाडी, रवींद्रनगर, शिवनेरी, पावस तेलीवाडी, पडवेवाडी, आदर्शनगर, चाफेरी जेएसडब्लू २ कॉलनी, गोळप सडा-फिनोलेक्स कॉलनी, शिरगाव गायवाडी, एमआयडीसी मोहिनी अपार्टमेंट, नाचणे शांतीनगर स्टॉप, गोळप सडा फिनोलेक्स कॉलनी, भाट्ये जोयनाकवाडी, हातखंबा भुतेवाडी, झरेवाडी गोताडवाडी, साईनगर, कुवारबाव, रवींद्रनगर, समर्थकृपा, वास्तू संगम अपार्टमेंट, टीआरपी, खेडशी प्रसादनगर, टीआरपी गणेश कॉलनी, नाचणे, गराटेवाडी, कुवारबाव, भाट्ये मुरकरवाडी, फिनोलेक्स कॉलनी, झाडगाव म्युनिसिपल हद्दीबाहेर, मिरजोळे, रत्नागिरी, गोळप-संजीवनीनगर, बावनदी निवळी, कारवांचीवाडी, समाजमंदिर, खेडशी.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (११ सप्टेंबर) आणखी ७५ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता २२४९ झाली आहे. आतापर्यंत ११५३ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १०६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप ३७५ अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ३५ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ८६५२ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत. नागरी क्षेत्रात संस्थात्मक विलगीकरणात ४५२७ व्यक्ती आहेत.

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply