रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२५ सप्टेंबर) ११६ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ७०७० झाली आहे. सिंधुदुर्गात आज ७७ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ३४७३ झाली आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज एकाच दिवशी विक्रमी ३७४ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत ५७१२ जणांनी करोनावर मात केली असून बरे होण्याचा दर आता ८०.७९ टक्क्यांवर पोहोचला आहे.
नव्या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मात्र कालच्या तुलनेत आज वाढ झाली. आज नवे ११६ रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ७०७० झाली आहे. आजच्या रुग्णांचा चाचणीनिहाय तपशील असा – आरटीपीसीआर – दापोली २, खेड १३, गुहागर २, चिपळूण २१, संगमेश्वर ११, रत्नागिरी २५, लांजा ६, राजापूर २. (एकूण ८२). रॅपीड अँटिजेन टेस्ट – खेड ३, गुहागर ९, चिपळूण ६, रत्नागिरी ९, लांजा ७. (एकूण ३४).
आज तिघा करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यापैकी एक महिला, तर दोघे पुरुष आहेत. तिघांचाही मृत्यू शासकीय रुग्णालयांत झाला आहे. जिल्ह्यात करोनामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या २४० झाली आहे. आजच्या मृतांचा तपशील असा – रत्नागिरी वय ६६ महिला, चिपळूण अनुक्रमे वय ७२ आणि ५९ (दोघेही पुरुष). जिल्ह्याचा मृत्युदर ३.३९ टक्के झाला आहे.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२५ सप्टेंबर) आणखी ७७ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ३४७३ झाली आहे. आतापर्यंत २२६९ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ११३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप १४३ अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ७१ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ४८३२ व्यक्ती गृह आणि शासकीय संस्थात्मक विलगीकरणात आहेत. नागरी क्षेत्रात संस्थात्मक विलगीकरणात १२ हजार ९०२ व्यक्ती आहेत.
