रत्नागिरीत ६८, तर सिंधुदुर्गात ९२ नवे करोनाबाधित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२७ सप्टेंबर) करोनाचे नवे ६८ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ७१८२ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी ९२ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ३६४२ झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (२७ सप्टेंबर) नवे ६८ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ७१८२ झाली आहे. आजच्या रुग्णांचा चाचणीनिहाय तपशील असा – आरटीपीसीआर – दापोली १, गुहागर १, चिपळूण २, संगमेश्वर ५, रत्नागिरी ३, लांजा ३, राजापूर ७ (एकूण २२). रॅपीड अँटिजेन टेस्ट – खेड २, गुहागर १, चिपळूण ३५, रत्नागिरी ७, लांजा १ (एकूण ४६).

आज १२० रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत करोनावर मात केलेल्या रुग्णांची एकूण संख्या ६०१६ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ८३.७६ टक्के झाला आहे.

करोनाबाधित पाच रुग्णांचा मृत्यू आज नोंदवला गेला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या २५० झाली असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.४८ टक्के झाला आहे. आज नोंद झालेल्या मृतांपैकी चिपळूणमधील एका ७३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू २६ सप्टेंबरला सरकारी हॉस्पिटलमध्ये झाला होता. संगमेश्वर, चिपळूण येथील अनुक्रमे ५० आणि ६३ वर्षांच्या महिला आणि खेड आणि चिपळूणमधील अनुक्रमे ५२ आणि ७२ वर्षांचे पुरुष अशा चौघांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला असून, त्यांची नोंद आज झाली.

तालुकानिहाय मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ७२, खेड ४२, गुहागर ८, दापोली २७, चिपूळण ६१, संगमेश्वर २३, लांजा ७, राजापूर ८, मंडणगड २ (एकूण २५०)

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२७ सप्टेंबर) आणखी ९२ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ३६४२ झाली आहे. आतापर्यंत २४५० जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १११२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप १५० अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ८० जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ४८३२ व्यक्ती गृह आणि शासकीय संस्थात्मक विलगीकरणात आहेत. नागरी क्षेत्रात संस्थात्मक विलगीकरणात १२ हजार ९५२ व्यक्ती आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply