रत्नागिरीत आज केवळ चार नवे करोनाबाधित; सिंधुदुर्गात ११ नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (पाच नोव्हेंबर) केवळ चार नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ८४९८ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १२ नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ४९७३ झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (पाच नोव्हेंबर) १० रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ७९८३ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९३.९३ टक्के आहे.

जिल्ह्यात आज नवे चार रुग्ण आढळले आहेत. त्यांचा तालुकानिहाय तपशील असा : आरटीपीसीआर – रत्नागिरी २ (एकूण २). रॅपिड अँटिजेन टेस्ट – रत्नागिरी २ (एकूण २) (दोन्ही मिळून ४)

जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८४९८ झाली आहे. बाधितांचा दर १४.७२ टक्के आहे. सध्या ८९ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. आतापर्यंत ३१७ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ३.७३ टक्के आहे.

मृतांची तालुकानिहाय संख्या – रत्नागिरी ८७, खेड ५०, गुहागर १२, दापोली ३२, चिपळूण ७५, संगमेश्वर ३३, लांजा ११, राजापूर १४, मंडणगड ३.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (पाच नोव्हेंबर) १२ व्यक्तींचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४९७३ झाली आहे. आज ४२ जण करोनामुक्त झाले असून, आतापर्यंत ४४५७ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १२७ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply