रत्नागिरीत १०, सिंधुदुर्गात २३ जणांची करोनावर मात

रत्नागिरी, सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात १०, तर सिंधुदुर्गात २३ करोनाच्या रुग्णांनी करोनावर यशस्वी मात घरून आपले घर गाठले.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील करोनाच्या रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. आज (८ नोव्हेंबर) रत्नागिरीत केवळ ९ करोनाबाधित रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ८५२५ झाली आहे. आजच्या रुग्णांचा चाचणीनिहाय तपशील असा – आरटीपीसीआर – संगमेश्वर ३, रत्नागिरी ४ (एकूण ७). अँटीजेन टेस्ट – लांजा १, रत्नागिरी १ (एकूण २). आजही एकाही करोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झाली नाही.
आज १० रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने एकूण बरे झालेल्यांची संख्या ८०८४ झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (८ नोव्हेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत २३ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे एकूण ४ हजार ५५१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. सद्यःस्थितीत जिल्ह्यात ३२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १७ करोनाबाधित व्यक्ती आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली. त्यामुळे आजपर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या पाच हजार एक झाली आहे. सध्या रुग्णालयात असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात ६ जण असून त्यापैकी चौघे ऑक्सिजनवर, तर दोघे व्हेंटिलेटरवर आहेत. आजअखेर जिल्ह्यात १२७ जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply