रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात प्रत्येकी १३ नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१८ नोव्हेंबर) १३ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर तीन जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गातही आज १३ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज तीन रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ८१४८ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९४.६३ टक्के आहे.

जिल्ह्यात आज १३ रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८६१० झाली आहे. बाधितांचा दर १४.४२ टक्के आहे.

आजच्या बाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआर – रत्नागिरी १, गुहागर १, चिपळूण २ (एकूण ४); रॅपिड अँटिजेन टेस्ट – रत्नागिरी ६, दापोली १, खेड १, चिपळूण १ (एकूण ९) (दोन्ही मिळून १३)

सध्या ७१ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. त्यापैकी २० जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यात करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या ३१९ आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ३.७० टक्के आहे.

मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – रत्नागिरी ८७, खेड ५१, गुहागर १२, दापोली ३२, चिपळूण ७६, संगमेश्वर ३३, लांजा ११, राजापूर १४, मंडणगड ३.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१८ नोव्हेंबर) १३ नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ५१०३ झाली आहे. सध्या १६१ जण उपचारांखाली आहेत. जिल्ह्यातील एकूण करोनामुक्तांची संख्या ४७९९ आहे. देवगड तालुक्यातील मोंड येथील ७० वर्षीय पुरुष आणि कणकवलीतील शिवशक्तीनगरमधील ७४ वर्षीय पुरुष अशा दोघांचा आज करोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यातील १३७ जणांचा बळी करोनाने घेतला आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply